इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सैफ अली खान हा छोटे नवाब म्हणून ओळखला जातो. तो खरोखरीच नवाब आहे. पतौडी खानदानाचा नवाब असलेल्या सैफ याची मोठी मुलगी सारा अली खान ही देखील अभिनेत्री आहे. दिसायला निरागस पण तितकीच खोडकर अशी लहान मुलासारखी असलेली सारा सर्वांचीच लाडकी आहे. साराने नुकताच आपल्या आलिशान गाड्यांचा डामडौल बाजूला सारत सार्वजनिक वाहनाने प्रवास केला आहे. याबाबतचा व्हिडीओ देखील तिने पोस्ट केला आहे.
सारा अली खान ही मोठ्या कुटुंबातील असली तरी या चंदेरी दुनियेच्या झगमगाटापासून ती तशी लांबच असते. सोशल मीडियावर सक्रिय असलेली सारा ही बॉलीवूडमधील नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक असूनही तिचे पाय कायम जमिनीवर असतात. म्हणून तिची वेगळी ओळख आहे. सुशांत सिंह राजपूत याची मुख्य भूमिका असलेल्या ‘केदारनाथ’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सारा अली खानने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सारा लोकल ट्रेन आणि रिक्षाने प्रवास करताना दिसत आहे.
व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं आहे, “नमस्कार… आज आम्ही आमच्या डोक्याचा वापर केला. वेळेचा सदुपयोग करत आम्ही लोकलने प्रवास केला आहे. साराने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तसेच तिने मेकअपदेखील केलेला नाही. त्यामुळे ती आणखी सुंदर दिसत आहे. साराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तिचा साधेपणा चाहत्यांना आवडला आहे. एवढी श्रीमंत असूनही लोकलने प्रवास, अभिमान वाटतो, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
२०१८ मध्ये साराने ‘केदारनाथ’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिचा पहिलाच सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यानंतर तिने ‘सिम्बा’ ‘कुली नंबर 1’, ‘लव आज कल’, ‘अतरंगी रे’ अशा अनेक सिनेमांत काम केलं. लवकरच ती ‘मेट्रो इन दिनो’, ‘नखरेवाली’, ‘लुका छुप्पी’, ‘गॅसलाइट’ आणि ‘द इमोर्टल अश्वाथामा’ या सिनेमांत झळकणार आहे.
Actress Sara Ali Khan Mumbai Local Train Journey Video