मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मातृत्व हे कोणत्याही स्त्रीला सुखावणारे असते. पण सगळ्यांच्याच नशीबात मातृत्व सहज आणि पटकन येत नाही. त्यासाठी त्यांना बरेच प्रयत्न करावे लागतात. त्यात सेलिब्रिटीही मागे नाहीत. अनेक महिला कलाकारांना आई होण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागले आहेत. हिंदी आणि बिहारी चित्रपटात काम करणारी अभिनेत्री संभावना सेठ ही गेल्या काही वर्षांपासून आई होण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे.
अभिनेत्री संभावना सेठ त्यासाठी IVF ट्रिटमेंटचा आधार ही दोन वेळा घेतला आहे. पण तिच्या पदरी निराशाच आली आहे. आई होण्याचे सुख तर नाही पण आता या सगळ्या गोष्टीमुळे ती एका गंभीर आजारातूनही जात आहे. याची नुकतीच माहिती तिने दिली आहे. संभावना सेठ सोशल मीडियावर फार सक्रिय असते. आपल्या खासगी आयुष्याबाबत ती बिनधास्त व्यक्त होते. हिंदी ‘बिग बॉस’ या बहुचर्चित कार्यक्रमामुळे संभावना प्रकाशझोतात आली.
सध्या ती आरोग्यविषयक समस्यांमुळे त्रस्त झाली आहे. संभावनाने आई होण्यासाठी आयव्हीएफचा (IVF) आधार घेतला होता. जवळपास तीन वेळा तिने आयव्हीएफ केलं. मात्र तिच्या हाती अपयशच आलं. आता संभावनाला एका गंभीर आजाराचा सामना करावा लागत आहे. तिने तिच्या युट्युब चॅनलद्वारे व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली. रूमेटाइड अर्थराइटिस हा आजार आपल्याला झाला असल्याचं संभावनाने सांगितलं आहे.
या आजारामुळे तिला चालणं देखील कठीण झालं आहे. हात आणि पायाला सूज, वेदना तिला होत आहेत. आपल्या आजाराबाबत सांगताना संभावनाचा कॅमेऱ्यासमोरच अश्रू अनावर झाले. पुढे बोलताना ती म्हणाली, “मुल हवं म्हणून मी कित्येकदा आयव्हीएफ केलं. पण माझे सगळे प्रयत्न फसले. अजूनही मी हिम्मत हारणार नाही. मला या सगळ्या प्रसंगांचा सामना करायचा आहे.” अभिनेता-लेखक अविनाश द्विवेदीशी संभावनाने २०१६मध्ये लग्न केलं. सुखी संसार करत असलेल्या संभावनाला अनेक आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
इतकंच नव्हे तर वाढत्या वजनामुळे तिला बऱ्याचदा ट्रोल देखील करण्यात येतं. पण तिची अशी अवस्था नेमकी का झाली? याचं खरं कारण आता समोर आलं आहे. रूमेटाइड अर्थराइटिस हा आजार संभावनाला आधीपासूनच होता. पण कालांतराने यामधून ती पूर्णपणे बरी झाली. पण पुन्हा एकदा तिच्या या आजाराने डोकं वर काढलं आहे. या आजारामुळे संभावना थंड वातावरण देखील सहन करू शकत नाही.
संभावना म्हणते की , माझ्यापाठी काही ना काही अडचणी असतात. एक गोष्ट चांगली झाली की लगेच दुसरी गोष्ट समोर येऊन उभी राहते. मला माझा पती अविनाशचं खूप वाईट वाटतं. आयव्हीएफमुळे पुन्हा मला या आजाराचा सामना करावा लागत आहे. यात पुढे ती नवऱ्याचा उल्लेख करत सांगते की, यामध्ये त्याचा कोणताही दोष नसताना त्याला मात्र या सगळ्या गोष्टी सहन करावा लागत आहे. असेही तिने सांगितले आहे.
Actress Sambhavna Seth Serious Disease Medical Problem Video
IVF Treatment