इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – दाक्षिणात्य अभिनेत्री समंता काही महिन्यांपासून मायोसिटीस या आजाराने त्रस्त आहे. यामुळे सोशल मीडियावर समंता सातत्याने चर्चेत आहे. ‘पुष्पा’ सिनेमातील ‘ऊ आंटवा’ या गाण्यामुळे समंताने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले होते. सध्या ती आजारी असली तरी तिच्या ‘यशोदा’ या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे.
‘यशोदा’ हा चित्रपट ११ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी असतानाच एका मुलाखतीत समंथा हिला तिच्या आजाराबद्दल विचारण्यात आले. यावर प्रतिक्रिया देताना तिला अचानक रडू फुटले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आपल्या आजाराची हेडलाईन करण्याची काहीच गरज नाही, असं ती सांगते. मी अजून जिवंत आहे. त्याबाबत एवढी चर्चा करायला हवी, असं काही मला वाटत नाही. मात्र, हे सांगताना तिचा बांध फुटला.
आजारपणावर बोलताना समंथा म्हणते, “या आजाराशी लढताना अनेकदा असे वाटले की आता हा प्रवास इथेच संपला. हा काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. पण मला हार मानायची नव्हती. त्यामुळे आजाराशी लढण्याचे ठरवले. मग स्वतःच्या मनाशी निश्चय केला. काही दिवस चांगले तर काही दिवस वाईट असतात. पण प्रत्येक दिवसाचा अनुभव घेणे महत्त्वाचे असते. असे निराश होऊन चालत नाही. अखेर आपण जिंकतोच. हा सगळा प्रवास कठीण असला तरी मी आज इथे आहे. आणि या आजाराशी लढणार आहे असा ठाम निश्चय तिने व्यक्त केला. मात्र, हे सांगताना आपला प्रवास आठवून तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
माझ्या या आजाराविषयी माझ्या कानावर अनेक अफवा आल्या. त्या संतापजनक होत्या. माझी प्रकृती खूपच गंभीर असल्याचे काहींनी लिहिले होते. मात्र मी सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छिते की हा जीवघेणा आजार नाही. यातून मी निश्चित बरी होईन. माझ्या मते अशा हेडलाईन्सची गरज नाही”. समंताने सिनेमाच्या डबिंगवेळी देखील तिचे फोटोज शेअर केले होते. तिने सलाईन लावून डबिंगचे काम पूर्ण केले होते.
काय आहे मायोसायटिस?
मायोसायटिस हा एक दुर्मिळ आजार आहे. यामध्ये स्नायूंना सूज येते. स्नायू दुखावल्यामुळे प्रचंड थकवाही येतो. या आजाराचे पाच प्रकार आहेत. यातल्या काही प्रकारांमध्ये त्वचेवर रॅशही येते. या आजाराचं निदान करणं कठीण आहे. याची लक्षणं कधी चटकन दिसतात, तर कधी ही लक्षणं दिसायला खूप वेळ लागतो. या आजाराचं निदान करणंही अवघड असतं. स्नायूंमध्ये प्रचंड वेदना, गिळायला होणारा त्रास, श्वास घ्यायला होणारा त्रास अशी या आजाराची काही ढोबळं लक्षणं आहेत.
#Samantha opens up about handling her health issues. #Yashoda #YashodaTheMovie pic.twitter.com/r2Xc3uUuKT
— AndhraBoxOffice.Com (@AndhraBoxOffice) November 8, 2022
Actress Samantha Prabhu Video Viral Crying