इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चित्रपट विश्वातील कलाकारांच्या कामाच्या विचित्र वेळा पाहता त्यांना फिजिकली फिट राहणेही अत्यंत गरजेचे असते. म्हणूनच या कलाकारांचे डाएट प्लॅन्स, वर्कआऊट, योगा सेशन्स याची सोशल मीडियावर कायमच चर्चा आणि क्रेझ असते. याच पठडीत आता दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभू हिचाही समावेश झाला आहे.
समंथाचा जिममधील फिटनेस वर्कआऊटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पिळदार शरीरयष्टीसाठी समंथा जिममध्ये घाम गाळताना व्हिडोओत दिसते आहे. समंथाचा फिटनेसचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी दंग झाले आहेत. या व्हिडिओला नेटकरी भन्नाट प्रतिकिया देत आहेत. जिममध्ये व्यायाम करताना समंथा खूप फिट दिसत आहे.
दाक्षिणात्य चित्रपटांच्या माध्यमातून जगभरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री समंथा रुथ प्रभू पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. समंथाचा जिममधील फिटनेस वर्कआऊटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी समंथाने आरोग्याच्या समस्यांना सामोरं जात असल्याचं माध्यमांना सांगितलं होतं. ऑटोइम्यूनचा त्रास होत असल्याचं समंथाने सांगितलं होतं. त्यानंतरच बहुधा समंथाने आपल्या आरोग्याकडे जास्त लक्ष देण्याचे ठरवले असावे.
दाक्षिणात्य इंडस्ट्रीत समंथाचा बोलबाला आहे. समंथाने अभिनय केलेल अनेक दाक्षिणात्य चित्रपट लाखो सिनेचाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेले आहेत. जिममध्ये व्यायाम करताना समंथा खूप फिट दिसत आहे. समंथाच्या या व्हिडीओला लाखो नेटकऱ्यांनी लाईक केलं आहे. अप्रतिम अभिनयाचा ठसा उमटवण्याबरोबरच तिने चाहत्यांना आरोग्याचं तसेच त्यासाठी आवश्यक व्यायामाचं महत्त्व पटवून दिलं आहे.
व्हायरल झालेला हा व्हिडीओ समंथाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. समंथाचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. समंथाचा हा सुंदर व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “खूपच सुंदर व्हिडीओ आहे”.
Actress Samantha Prabhu Fitness Video Viral