इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – स्टारकिड्स हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. आणि त्यांच्या पोस्टकडे चाहत्यांचे लक्ष असते. सध्या अशीच एक पोस्ट चर्चेत आहे. ‘रामायण’ मालिकेचे निर्माते रामानंद सागर यांची पणती साक्षी चोप्रा हिची ही पोस्ट आहे. नेटफ्लिक्सच्या एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या साक्षीने या कार्यक्रमात लैंगिक शोषण झाल्याचा आरोप केला आहे.
काय आहे पोस्ट?
साक्षीने नेटफ्लिक्स शोच्या निर्मात्यांवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. या शोच्या निर्मात्यांनी साक्षीला एक अश्लील गोष्ट करण्यास सांगितल्याचे साक्षी सांगते. अनोळखी व्यक्तींसोबत डान्स, तसेच त्यांना अश्लील हावभाव करुन दाखवण्यास आणि रस्त्यावरील अनोळखी लोकांच्या पाठीला अश्लील स्पर्श करायला लावल्याचे तिने म्हटलं आहे. तिच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
साक्षीने नेटफ्लिक्सच्या ‘सोल प्रोडक्शन’ वर आरोप केले आहेत. ती ”त्या लोकांना वाटलं, त्यांनी सांगितलेल्या घाणेरड्या गोष्टींमध्ये मी सहभागी होईन. पण, तसं काही झालं नाही. साक्षी म्हणते, कॉन्ट्रॅक्टमध्ये ठरलेल्या गोष्टींप्रमाणेच त्यांनी काही केलं नाही. प्रत्यक्षात त्यांनी मला वेगळ्याच गोष्टी करायला सांगितल्या. कॉन्ट्रॅक्टनुसार, माझ्या आईसोबत दिवसातून एकदा बोलण्याची परवानगी होती. परंतु, सेटवर गेल्यानंतर मी काही खटकलेल्या गोष्टी सांगायचा प्रयत्न केल्यावर त्यांनी माझ्याकडून माझा फोन हिसकावून घेतला.
खरं तर आईशी बोलता येईल, या एकाच कारणामुळे मी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पण, तसे घडलेच नाही. याशिवाय तसंच काही गोष्टी माझ्या मनाविरुद्ध करुन घेण्याचा प्रयत्न केला. हा केवळ एक गेम शो आहे असं मला सांगण्यात आलं. ज्यात गाणी, कंटेन्ट मेकिंग यासारखे एन्टरटेनिंग टास्क असतील. यात, गॉसिप, ड्रामा असं काही नसेल असंही सांगण्यात आलं होतं”, असं साक्षी म्हणाली. नेटफ्लिक्सने जवळपास वर्षभरापेक्षा जास्त काळ मला त्रास दिला आहे. माझा या कार्यक्रमात सहभाग घेण्यास नकारच होता, पण ते फारच मागे लागले, त्यामुळे मी सहभागी झाले. पण, प्रत्यक्षात माझी दिशाभूल करण्यात आली.” यासोबतच प्रचंड मानसिक त्रास दिल्याचंही तिने म्हटलं आहे.
नेटफ्लिक्सचे सध्या तरी मौन
हा शो सध्या नेटफ्लिक्स इंडियावर प्रसारित होत आहे. ज्यात पार्थ समथान, मृदुल मधोक आणि रुही सिंग हे देखील सहभागी झाले आहेत. साक्षीने केलेल्या आरोपांवर नेटफ्लिक्सने कोणतंही स्पष्टीकरण दिलेले नाही.