इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावर प्रदर्शित होणाऱ्या मालिकांना प्रेक्षकांचा कायमच उत्तम प्रतिसाद मिळतो. प्रेक्षकांसाठी हा विरंगुळा असल्याने छोट्या पडद्यावरील मालिका मोठ्या प्रमाणावर पाहिल्या जातात. त्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. त्यातील कलाकारांवर तर प्रेक्षक जीवापाड प्रेम करतात. ‘स्टार प्लस’ या वाहिनीवर प्रसारित होणारी ‘अनुपमा’ ही मालिका देखील याच पठडीतील. या लोकप्रिय मालिकेमध्ये रुपाली गांगुली यांनी अनुपमा शहा हे प्रमुख पात्र साकारले आहे.
मध्यंतरी रुपाली या काही काळ मनोरंजन विश्वापासून लांब राहिल्या होत्या. या मालिकेद्वारे त्यांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केले. रुपाली सोशल मीडियावर सक्रिय आहेत. नुकतीच त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यावर एका दिग्दर्शक कमेंट करत तू तर ‘रोल्स अँड रॉयल्स’ची हक्कदार आहेस असे म्हणत रुपाली यांचे कौतुक केले आहे.
रुपाली गांगुली या सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. नुकताच त्यांनी आपल्या सोशल मीडियावर नव्या गाडीचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांच्यासोबत पती अश्विन वर्मा आणि त्यांचा मुलगा रुद्रांश वर्मा कार शोरूममध्ये दिसत आहेत. कार घेतल्यानंतर त्यांनी केक कापून तिचे स्वागत केले. रुपाली यांनी मर्सिडीज-बेंझ GLE या श्रेणीतील गाडी खरेदी केली असून ज्याची किंमत जवळपास ९० लाख इतकी आहे.
रुपाली गांगुली यांनी व्हिडीओला एक छानशी कॅप्शनही दिली आहे. “कृतज्ञता, मला स्वप्न पाहण्याची हिंमत दिल्याबद्दल धन्यवाद. मला माझ्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. रुद्रांश वर्मा हा मला मिळालेला सर्वात मोठा आशीर्वाद आहे. त्याच्यामुळेच माझे स्वप्न सत्यात उतरले. जय मातादी जय महाकाल,” अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. रुपाली यांच्या या पोस्टवर् अनेक कमेंट आल्या आहेत. त्यातच दिग्दर्शक हेरुंब खोत यांचाही समावेश आहे.
तू तुझ्या कामाप्रती घेत असलेल्या मेहनतीमुळे रोल्स अँड रॉयल्सची हक्कदार आहेस, असे त्यांनी म्हटले आहे. तर अनेकांनी रुपाली यांच्या कामाची प्रशंसा केली आहे. रुपाली या छोट्या पडद्यावरील सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहेत. रुपाली यांचे लाखो चाहते आहेत. मालिकेत रुपाली अशा महिलेची भूमिका साकारत आहे जी तिच्या कुटुंबासाठी अनेक गोष्टींचा त्याग करते, कारण तिला एक चांगली आई आणि पत्नी बनायचे असते. ही मालिका ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचा रिमेक आहे. याआधी त्यांनी ‘साराभाई Vs साराभाई’, ‘संजीवनी’, ‘बा बहू और बेबी’ या मालिकांमध्ये काम केले आहे.
Actress Rupali Ganguly New Luxurious Car Price Features