इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सुप्रसिद्ध अभिनेत्री रुबीना दिलैक हिचा नुकताच अपघात झाला. तिचा पती अभिनव शुक्लाने याची ट्विटद्वारे माहिती दिली. आपली काहीही चूक नसताना अशाप्रकारे अपघात होणे, हे किती त्रासदायक असते, याचा अनुभव आपण घेत असल्याचे रुबीना सांगते. रुबीनाच्या अपघाताची माहिती देताना तिचा पती अभिनवने अपघातग्रस्त कारचे फोटोही शेअर केले होते. या अपघातामध्ये रुबीना गंभीर जखमी झाली नसली तरी तिला या घटनेचा चांगलाच धक्का बसला. आता स्वतः रुबीनानेच अपघात कसा झाला याची माहिती दिली आहे.
कसा झाला अपघात?
एका वृत्तपत्राने रुबीनाच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. रुबीना सांगते, “मालाडमधील इनऑर्बिट मॉलजवळ हा प्रकार घडला. तशी मी सेफ गाडी चालवते. सिग्नल पिवळा झाल्यावरच मी गाडीचा वेग कमी केला होता. मात्र, ट्रक ड्रायव्हरने माझ्या गाडीला मागून धडक दिली. माझ्या गाडीचा वेग ४० ते ५० च्या दरम्यान होता. धडकेनंतर माझे डोके पुढच्या सीटवर आदळले आणि मागे आपटले. यामुळे माझ्या पाठीला दुखापत झाली. यानंतर मी काही काळ धक्क्यात होते. त्यानंतर अभिनव आला आणि त्याने परिस्थिती उत्तम प्रकारे हाताळली.”
वाहतुकीचे नियम पाळा
अंधेरीहून बांगूर नगर आणि हायपरसिटीच्या दिशेने प्रवास करताना अनेकजण वाहतूक नियमांचे पालन करत नसल्याचे आपण अनेकदा पाहिल्याचे रुबिनाने सांगितले. अनेकदा सिग्नललाही लोक थांबत नाहीत. हा माझ्या कुटुंबातील हा पहिलाच अपघात आहे, असे नाही. तर माझी काकू आणि चुलत भावंडाबरोबरही चंढीगडमध्ये अशाच प्रकारचा अपघात झाल्याचे रुबीना म्हणाली. रस्त्यावर सावधगिरी बाळगण्याचं आवाहन मी करते. नियम हे आपल्या सुरक्षिततेसाठीच असतात’, असं तिने लिहिलं आहे.
अभिनव आणि रुबिनाच्या या ट्विटवर मुंबई ट्रॅफिक पोलिसांनीही ट्विट केलं आहे. ‘ज्याठिकाणी दुर्घटना घडली आहे, तिथल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये घटनेची तक्रार नोंदवा’, असं त्यांनी म्हटलंय. मी मुंबई पोलिसांना अशा लोकांविरोधात कठोर कारवाई करण्याची विनंती करतो, असे अभिनवने त्याच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
https://twitter.com/RubiDilaik/status/1667734727116361729?s=20