इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेत्री रविना टंडन अलीकडे ऑफस्क्रीन असली तरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सातत्याने सोशल मीडियावर पोस्ट होणारे तिचे व्हिडीओज तिला अडचणीत आणण्याची शक्यता आहे. नुकतीच तिने ताडोबाची सैर केली. यावेळी तिने नियमांचं उल्लंघन करत सफारीदरम्यान वाघांच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न केला. याचा तिने केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. सातपुडा व्याघ्र संवर्धन केंद्रातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रवीनाने नियमांचं उल्लंघन करत सफारीदरम्यान वाघांच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात आता तपास सुरू करण्यात आला आहे.
रविनाने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये टायगर सफारीची जीप वाघाच्या अगदी जवळ जाऊन थांबताना दिसते आहे. या व्हिडीओमध्ये कॅमेरा शटर्सचे फोटो काढताना होणारे आवाजही येत आहे. हा वाघ या जीपकडे पाहून डरकाळी फोडतो आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार उपविभागीय अधिकारी धीरज सिंह चौहान यांनी मंगळवारी या प्रकरणामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तपास सुरू केला आहे.
धीरज यांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ नोव्हेंबर रोजी रवीना जंगल सफारीसाठी निघाली. वाघ पाहण्यासाठी जंगलातून फिरताना तिची जीप वाघाच्या अगदी जवळ जाऊन थांबली. हे नियमबाह्य आहे आणि त्याहीपेक्षा धोकादायक आहे. त्यामुळेच आता या प्रकरणामध्ये वाहनचालक आणि त्यावेळी कामावर असलेल्या अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात येणार आहे. त्यांची चौकशीही केली जाणार आहे.
वाघाच्या अगदी जवळ जाऊन केलेले हे चित्रीकरण रवीनाने सोशल मीडियावर शेअर केले आहे. यात वाघाचे फोटोही ट्वीट केले आहेत. आणि आता यावरूनच वादंग सुरु झाला आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच रवीनाने भोपाळमधील वनविहार राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली होती. यावेळी तिने काही लोक वाघाच्या पिंजऱ्यामध्ये दगड फेकत असल्याची तक्रार केली होती. रविनाने यासंदर्भात ट्वीट केल्यानंतर या प्रकरणाचा तपास करत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं.
https://twitter.com/TandonRaveena/status/1597608027657424898?s=20&t=4cHY682FWFsA0kd1yPzLvg
Actress Raveena Tandon Photography Tiger Project
Controversy Entertainment Bollywood Forest