इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडमध्ये ज्यांना फार लोकप्रियता मिळत नाही ते ओटीटीवर लोकप्रिय होत असल्याचे दिसते. त्यामुळे अनेकांसाठी हा मागचा दरवाजा ठरू घातला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना ओटीटीमुळे लोकप्रियता मिळत आहे. नुकतीच एका अभिनेत्रीने बॉलीवूडने आपली दखल घेतली नसल्याची खंत व्यक्त केली. जवळपास १३ वर्ष बॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध करणारी, प्रसिद्धीसाठी झगडणारी अभिनेत्री रसिका दुगलला ओटीटीने चांगलीच प्रसिद्धी दिली. त्यानंतर तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.
एका कार्यक्रमात रसिकाने बॉलिवूडमध्ये कराव्या लागलेल्या संघर्षाबद्दल भाष्य केलं आहे. रसिक सांगते, “बॉलिवूडमध्ये १३ वर्षात जी प्रसिद्धी मिळाली नाही ती मला ओटीटीने थोडक्या कालावधीतच दिली आहे.” मिर्झापूर या वेबसीरिजने रसिकाला अफाट लोकप्रियता मिळवून दिली. या वेबसीरिजविषयी रसिक सांगते, “मिर्झापूरमधील बीना त्रिपाठी या भूमिकेसाठी खूप मेहनत घ्यावी लागली. ही भूमिका साकरताना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामुळेच बीना त्रिपाठी हे पात्र अजरामर ठरले.
https://twitter.com/RasikaDugal/status/1565368137532723202?s=20&t=PxN_DkHTxwTD4e1z2zAIig
रसिका दुगल ही मूळची झारखंडची. पण तिने उच्च शिक्षणासाठी ती दिल्लीत गेली. तेथेच राहून तिने अभिनयाचा डिप्लोमा कोर्स केला. हा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर रसिका मुंबईत आली. २००७ पासून तिच्या करिअरला सुरुवात झाली. त्याच वर्षी रसिकाला ‘अन्वर’ हा पहिला चित्रपट मिळाला. यानंतरही ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली. परंतु या सर्व भूमिका छोट्या होत्या. २०१८ हे वर्ष मात्र तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरले. याच वर्षी ‘मिर्झापूर’ वेब सिरिजचा पहिला भाग ओटीटीवर रिलीज झाला. आणि ‘मिर्झापूर’ला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.
https://twitter.com/RasikaDugal/status/1563058664990134273?s=20&t=PxN_DkHTxwTD4e1z2zAIig
Actress Rasika Dugal on Bollywood and OTT