इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हिंदी बिग बॉसच्या लोकप्रियतेनंतर मराठीतही बिग बॉस सुरू करण्यात आले. या मराठी बिग बॉसला चांगला प्रतिसाद मिळाला. नुकताच ‘मराठी बिग बॉस सीजन ४’ मध्ये मसाला भरण्याचे काम केलेल्या आणि प्रेक्षकांना मनमुराद हसायला लावलेल्या अभिनेत्री राखी सावंत सध्या सातत्याने संकटांना तोंड द्यावे लागते आहे. आता संकटांची मालिका सुरू झाली आहे. राखी तशी नेहमीच चर्चेत असते. सध्या मात्र ती संकटांमुळे चर्चेत आहे.
राखीच्या आईचं २८ जानेवारीला निधन झालं. पण आता आईच्या निधनानंतर राखीवर नवं संकट आलं आहे. पती आदिल खान दुर्रानीवर राखीने गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. नवऱ्याचं अफेअर असल्याचंही राखीचं म्हणणं आहे. दरम्यान, राखीने जरी लग्नाची कबुली दिली असली तरी तिच्या नवऱ्याने ते नाकारले होते.
अभिनेत्री राखी सावंतचे तिच्या आईवर खूप प्रेम होत. बऱ्याच दिवसांपासून राखीच्या आई कॅन्सर आणि ब्रेन ट्यूमर या आजाराशी झुंजत होत्या. अखेर २८ जानेवारी रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर आता राखीच्या पतीचे म्हणजेच आदिल खान दुर्रानीचे प्रेमप्रकरण सुरू असल्याचे राखीचे म्हणणे आहे. राखीने आदिलला थेट धमकी दिली आहे. राखी म्हणाली, “आता माझी आई हयात नाही त्यामुळे यापुढे कोणतीही गोष्ट गमवल्याचं मला दुःख होणार नाही. ‘बिग बॉस मराठी’मध्ये मी दीड महिना होते, त्याचा तू गैरफायदा घेतला आहेस. आता मी त्या मुलीचं नाव सांगत नाही. पण वेळ आल्यावर मी त्या मुलीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करणार आहे.
यानंतर राखीने आदिलला तू मला घटस्फोटाची धमकी देऊ नकोस असं म्हटलं आहे. “मी रोजा करणार. मी उमराह येथे जाणार. आदिल मला घेऊन गेला तर ठीक. नाहीतर माझे मुस्लिम भाऊ आहेत त्यांना मी मला उमराहला घेऊन जा, असे सांगणार. मी माझ्या देवाला मानते. मी सत्यवचनी पत्नी आहे. मी खरेपणानेच इस्लाम धर्माचा स्वीकार केला. जर मी देवाला मानत असेल तर आदिल माझ्याकडे पुन्हा परत येईल. आदिल माझ्याबरोबर खरा वागला नाही तर तो इतर कोणत्याच मुलीबरोबर खरा वागणार नाही. मी त्याला माझं रक्त दिलं आहे. मी त्याला माझं सर्वस्व दिलं आहे. आदिल तू मला घटस्फोट देऊ शकत नाहीस. मी जगभरातील सगळ्या कोर्टमध्ये जाईन. तू मला घटस्फोटाची धमकी देऊ नको.” असेही राखीने म्हटले आहे. राखी आता घटस्फोट घेणार का ? की यापुढे आणखी काही घडणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Actress Rakhi Sawant Serious Allegation on Husband