इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बिग बॉस १५ मधून बाहेर पडताच अभिनेत्री राखी सावंतने अतिशय गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झाला आहे. ग्रँड फिनालेच्या तोंडावर राखीने हे आरोप केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
‘बिग बॉस 15’ च्या घसरत्या टीआरपीमुळे निर्माते हैराण झाले होते. परंतु याच वेळी राखी सावंत ने शो मध्ये एंट्री करून प्रेक्षकांची क्रेझ पुन्हा एकदा शो कडे वेधून घेतले. यापूर्वी कोणत्याही सीझनमध्ये जेव्हा जेव्हा राखी सावंतने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला तेव्हा निर्मात्यांना त्याचा फायदाच झाल्याचे दिसून येते. सिझन 15 ग्रँड फिनालेच्या तोंडावर राखी सावंत शोमधून बाहेर गेली आहे. याचवेळी राखीने अतिशय गंभीर आरोप केले आहेत. माध्यमांसमोर बोलताना राखी सावंत अचानक रडायला लागली आणि म्हणाली की, ती टिश्यू पेपर नाही. की जी शोमध्ये वापरली आणि फेकली गेली. बिग बॉस तिचा प्रत्येक सिझन मध्ये मनोरंजनासाठी ‘वापर’ करतो. परंतु तिला विजेत्याची ट्रॉफी देत नाही, असा आरोप राखीने केला आहे.
राखीने जिमबाहेर मीडियाशी संवाद साधला. राखी म्हणाली की, ‘याचा अर्थ असा आहे की जर बिग बॉसने मला दरवर्षी बोलावले तर तुम्ही माझा फक्त टिश्यू म्हणून वापर करता. मी टिश्यू पेपर नाही, बिग बॉस. मी एक मनुष्य आहे मनोरंजनासाठी,.जोपर्यंत संत्र्यामध्ये रस असेल तोपर्यंत तुम्ही ते पिळून घ्याल आणि नंतर त्याची साल फेकून द्याल. राखी पुढे म्हणाली की, ‘मी कोणताही संत्रा, लिंबू किंवा कोणताही टिश्यू पेपर नाही बिग बॉस. तुम्ही माझ्याकडून मनोरंजन करून घ्याल परंतु जेव्हा फिनालेची वेळ येते तेव्हा तुम्ही इतरांना फिनालेमध्ये घेऊन जाता. बिग बॉस तुला माहित आहे की मी तुमच्यावर खूप प्रेम करते. आणि मी ट्रॉफी जिंकण्यास पात्र होते.
तिचे चाहते तिच्यासोबत सहमत असल्याचे दिसत होते. एका यूजरने लिहिले आहे की- ‘पुढच्या वेळी जाऊ नकोस.’ तर एक म्हणाला, ‘सही बोलती है राखी.’ अश्या प्रकारे काही लोकांनी ‘बिग बॉस ने चुकीचे केले’ असे लिहित बिग बॉस वर टीका ही केल्याचे दिसले आहे. राखीने, ‘पती’ रितेश सिंगसोबत शोच्या मिड सीझनमध्ये प्रवेश केला होता. राखीने रितेशची ओळख जगासमोर करण्याची ही पहिलीच वेळ होती. तथापि, नंतर तिने कबूल केले की दोघांनी अद्याप लग्न केले नाही आणि हॉटेलच्या खोलीत त्यांनी ‘फेरे’ घेतले होते. राखीला शोमधून बाहेर काढल्यामुळे, बिग बॉस सीझन 15 ट्रॉफीची शर्यत शमिता शेट्टी, तेजस्वी प्रकाश, करण कुंद्रा, निशांत भट, रश्मी देसाई आणि प्रतीक सहजपाल या सहा स्पर्धकांमध्ये झाली आहे. या वीकेंडला होणाऱ्या ग्रँड फिनालेमध्ये विजेत्याचा निर्णय घेतला जाईल.