इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्वातील काही अभिनेते, अभिनेत्री हे त्यांच्या कामापेक्षा गॉसिपिंगमुळेच जास्त चर्चेत असतात. आणि अनेकदा या कलाकारांना देखील त्याचेच वेड असते. काहीतरी विचित्र वागायचे आणि चर्चेत राहायचे हाच एकमेव उद्योग असतो. राखी सावंत ही अशाच कलाकारांपैकी एक. नेहेमी काही न काही करून चर्चेत राहणाऱ्या राखीने आता लग्न केले आहे. ही बातमी बाहेर आली, आणि सर्वाना एकाच धक्का बसला आहे.
राखी नुकतीच ‘बिग बॉस मराठी’मध्ये झळकली होती. तिथे धमाल करणारी राखी सांवत रविवार, ९ जानेवारी रोजी बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडली. तिचा बॉयफ्रेंड आदिल खान तिला सेटवर घ्यायला आला होता. घराबाहेर पडताच तिच्या आईला ब्रेन ट्युमर झाल्याचं राखीला कळलं. दोन दिवस राखी आईच्या काळजीत असल्याचं दिसत होतं. त्यातच कालपासून तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. आता राखीने याबाबत एक महत्त्वाचा खुलासा केला आहे.
या व्हायरल फोटोंमध्ये राखी सावंत आणि आदिल हे एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालत असून त्यांच्या हातात मॅरेज सर्टिफिकेट दिसते आहे. यावेळी राखीने पारंपरिक ड्रेस परिधान केला आहे, तर आदिल फॉर्मल शर्ट आणि पॅंटमध्ये आहे. दुसऱ्या फोटोत राखी आणि आदिल मॅरेज सर्टिफिकेटवर सही करताना दिसत आहेत. या फोटोंसोबतच त्यांच्या मॅरेज सर्टिफिकेटचा फोटोही व्हायरल होत आहे. या मॅरेज सर्टिफिकेटमध्ये लग्नाची तारीख २९ मे २०२२ दिसत आहे. म्हणजेच या दोघांनी मागच्या वर्षीच लग्न केल्याचं समजतंय. फोटो व्हायरल झाल्यानंतर या निव्वळ अफवा असल्याचं आदिल म्हणाला. तर दुसरीकडे राखीने मात्र स्वतःच्या इन्स्टाग्रामवर या फोटोंसह आणखी काही फोटो शेअर करून आदिलबरोबर लग्नाला दुजोरा दिला आहे. “मी खूप आनंदी आहे, मी लग्न केलं आहे, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आदिल,” असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
राखीने एकमेकांना वरमाला घालतानाचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. तिथे काही जण उपस्थित असून राखी आणि आदिल एकमेकांना वरमाला घालत आहेत. दरम्यान, राखीने लग्नाचे फोटो शेअर करताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिच्या चाहत्यांसह इंडस्ट्रीतील तिचे मित्र-मैत्रिणी तिला शुभेच्छा देत आहेत. ‘बिग बॉस मराठी’मध्ये राखी सावंतने चॅलेंजर म्हणून या या चौथ्या सिजनमध्ये चांगलीच रंगत आणली होती.
Actress Rakhi Sawant Marriage Viral Photos