सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मनोरंजन विश्वात ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या राखी सावंतसोबत रोज काही ना काही घडत असते, ज्यामुळे ती चर्चेत येते. अभिनेत्रीने तिच्या करिअरमध्ये खूप संघर्ष केला आहे आणि ती लोकांची आवडती बनली आहे. पण वैयक्तिक जीवनातील त्यांचा संघर्ष नेहमीच वेगळ्या पातळीवर राहिला आहे. राखी सावंतने जेव्हा तिच्या लग्नाची बातमी सांगितली तेव्हा तिचे रितेशसोबतचे नाते खूपच गूढ होते. राखीने सोशल मीडियाच्या माध्यमातून सस्पेन्स निर्माण करून आणखीनच रहस्यमय बनवले होते. पण बिग बॉस 15 मध्ये पहिल्यांदाच राखीचा पती रितेश लोकांसमोर आला. पण आता हे नातेही संपुष्टात आले आहे. राखीनेच ही माहिती दिली आहे.
अभिनेत्री राखी सावंतने जेव्हा तिच्या लग्नाची बातमी सांगितली तेव्हा तिचे रितेशसोबतचे नाते खूपच गूढ होते. राखीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आणखीनच रहस्यमय केले. पण बिग बॉस 15 मध्ये पहिल्यांदाच राखीचा पती रितेश लोकांसमोर आला. पण आता हे नातेही संपुष्टात आले आहे. राखी सावंतने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने पती रितेशसोबतच्या ब्रेकअपची बातमी शेअर केली आहे. राखी सावंतने लिहिले की, ‘प्रिय मित्र आणि शुभचिंतकांनो, रितेश आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. बिग बॉस शो नंतर बरेच काही घडले आणि मी अशा अनेक गोष्टींचा सामना केला ज्यावर माझे नियंत्रण नव्हते.आम्ही गोष्टी दुरुस्त करण्याचा खूप प्रयत्न केला पण काहीही झाले नाही. आपण कायमचे वेगळे व्हावे आणि वेगळे आयुष्य जगावे हेच आम्हा दोघांसाठी चांगले होते. मला हे सगळं व्हॅलेंटाईन डेच्या आगोदर तुम्हांला सांगायचं आहे, हे विचार करून मला खूप विचित्र वाटतं. माझे मन तुटले आहे, पण निर्णय घेणे आवश्यक होते. रितेशला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. शिवाय, मला आता माझ्या पुढील करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे. मला माझ्या स्वतःच्या आयुष्यात वेळ द्यायचा आहे. मला आनंदी जीवन जगायचे आहे. मला समजून घेतल्याबद्दल आणि समर्थन केल्याबद्दल धन्यवाद. राखी सावंत.’
रितेश सोबतची तिची प्रेम कहाणी विषयी बोलतांना राखीने सांगितले की, ‘ आम्ही ६ महिने एकमेकांशी व्होट्स अॅप चॅट केले. माझी खात्री पटावी म्हणून रितेशने मला त्याचा घरचा पत्ता, बँक खात्याचे तपशील मला पाठवले. त्यामुळे माझा त्याच्यावर विश्वास बसला. त्यानंतर त्याने मला लग्नासाठी प्रपोज केले. आमचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले. आणि आता आम्ही वेगळे होतोय.बिग बॉस च्या घरातून बाहेर आल्यानंतर मला समजले की रितेशचे लग्न झालंय आणि त्याल अएक बाळही आहे. तेव्हा माझे मन तुटले. मी कोणत्याही स्त्रीवर किवा मुलावर अन्याय करू शकत नाही.या नंतर आमच्यात खूप वाद झाला आणि रितेश त्याची बॅग घेऊन मला एकटे सोडून गेला. पण जर रितेशचा त्याच्या पत्नीसोबत घटस्फोट झाला आणि त्याल अमाझ्याकडे परत यायचे असेल तर मी त्याची वाट पाहीन’, असे राखी म्हणाली आहे.
राखी सावंत आणि रितेश हे बिग बॉस 15 मधील स्टार कपल होते. दोघांची फॅन फॉलोइंग झपाट्याने वाढली. दोघांची स्टाईल चाहत्यांनाही आवडली होती, पण घरात दोघांचे नाते अनेक गैरसमजांचे बळी ठरले आणि यादरम्यान अनेक चढउतारही पाहायला मिळाले. राखीची ही पोस्ट सोशल मिडीयावर खूप चर्चेत आहे आणि यावर लोक काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे रंजक ठरेल. राखीच्या काही चाहत्यांनी यावेळी तिच्या निर्णयाला शुभेच्छा दिल्या तर काहींनी असेच व्हायला हवे असे मानले, तर एकाने लिहिले, “हा सर्वोत्तम निर्णय आहे, आम्हाला तुझा अभिमान आहे.” तर दुसर्याने लिहिले, “बिग बॉसने सर्व काही Trp साठी नियोजित केले होते, रितेश आणि राखीचे लग्न झाले नव्हते! हे सर्व स्क्रिप्टेड आहे.”