इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नुकताच दुःखाचा डोंगर कोसळलेल्या अभिनेत्री राखी सावंतच्या आयुष्यात आता आणखी एक वादळ आलं आहे. गेले काही दिवस आदिल खान दुर्रानीवर राखी विवाहबाह्य संबंधाचा आरोप लावत होती. आदिलची कोणीतरी गर्लफ्रेंड असल्याचं काही दिवसांपूर्वीच राखीने म्हटलं होतं. आमचे वैवाहिक आयुष्य सुधारले नाही तर मी आदिलच्या गर्लफ्रेंडचं नाव सार्वजनिक करेन आणि तिचे फोटो, व्हिडीओ सर्वांसमोर आणेन असंही राखीने म्हटलं आहे. त्यानुसार आता तिने आदिल खानची पोलखोल केली असून आदिलचं अफेअर ज्या मुलीबरोबर आहे त्या मुलीचं नाव तनू असल्याचं राखीने स्पष्ट केलं आहे.
राखी सावंतने आदिल खानच्या गर्लफ्रेंडचं नाव तनू आहे असं सांगितलं आहे. राखी जेव्हा मराठी बिग बॉसमध्ये होती त्यावेळी या दोघांचं अफेअर सुरू झाल्याचं राखीने म्हटलं होत. पाच आठवड्यांनंतर जेव्हा ती बिग बॉसच्या घरातून बाहेर आली तेव्हा तिला याबद्दल समजलं. दरम्यान, तिने त्यानंतर आदिलला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. त्याच वेळी तिची आई आजारी होती. पण राखीच्या म्हणण्यानुसार अदिलने तिचं म्हणणं अजिबात ऐकलं नाही. त्यानंतर राखीने त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव सर्वांसमोर जाहीर केलं. आदिल देखील या प्रकाराने हलला असल्याची चर्चा आहे. या प्रकरणात राखीला सगळ्यात जास्त मनस्ताप झाल्याचे तिने सांगितलं होत. पती आदिलने हे टोकाचं पाऊल उचलण्यास भाग पडल्याचं देखील तिने म्हटलं आहे.
सोशल मीडियावर सध्या तनू आणि आदिल यांचे काही फोटोही व्हायरल होताना दिसत आहेत. राखीच्या म्हणण्यानुसार तनू मूळची इंदौरची आहे. त्या ठिकाणी आदिलचा एक फ्लॅट आहे. त्याची एक बीएमडब्ल्यू कारही तेथे आहे. राखीने दिलेल्या माहितीनुसार तनु आयआयटी पासआउट आहे आणि आता एक बिझनेसवुमन आहे. ८ वर्षांपासून ती बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करत आहे. तिने काही लहानमोठ्या प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे. तिचं वय ३७ वर्ष आहे.
दरम्यान, तनुचं पूर्ण नाव काय आहे याचा खुलासा राखीने केलेला नाही. सोशल मीडियावर जे काही फोटो व्हायरल झाले आहेत त्यावरून तनुचं पूर्ण नाव तनु चंडेल असल्याचं बोललं जात आहे. ती एक टिकटॉकर आहे. निवेदिता चंडेल हे तिचं खरं नाव आहे. आदिला खानही तिला इन्स्टाग्रामवर फॉलो करतो. मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
https://www.instagram.com/p/CoUMCldsgP8/?utm_source=ig_embed&ig_rid=9effa111-d2e0-45af-a4ad-b8f127085437
Actress Rakhi Sawant Husband Adil Girl Friend Issue