मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुरुंगातून बाहेर येत नाही तोच राखी सावंतचा पती आदिल खान याने तिच्या तब्बल २०० कोटींचा दावा ठोकला आहे. यामुळे त्यांच्यातील वाद अधिक चिघळणार असल्याचे चित्र आहे.
कधी आदिल राखीवर प्रेस घेत आरोप करतो तर कधी राखी त्याच्यावर पटलटवार करत असते. आता तर आदिलला राखीची जिवलग मैत्रिण राजश्रीचीही सोबत मिळाली आहे. त्यामुळे आता राखीच्या अडचणीत वाढ झाली आहे. दोघांमधील शाब्दिक युद्धही सुरु आहे. एकीकडे दोघेही मीडियामध्ये एकमेकांवर अनेक आरोप करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे दोघेही एकमेकांवर गुन्हे दाखल करणे टाळत आहे. त्यात इतक्या वादविवादाच्या सत्रात राखी सौदी अरेबियातील मक्का येथे गेली होती .ती भारतात परतली. त्यानंतर तिने पुन्हा आदिलवर आरोप केला मात्र आता पुन्हा एकदा तिच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे.
आता आदिल खानने तिच्याविरुद्ध २०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. आदिलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे ज्यात त्याने राखीवर आरोप करत तिच्यावर मानहानीचा दावा दाखल केल्याचे सांगितले. मात्र त्याने १-२ लाख रुपयांसाठी नव्हे तर तब्बल २०० कोटी रुपयांचा खटला दाखल केला आहे.
राखीला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न
राखीवर कोणती केस केली असे ज्यावेळी आदिलला विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, ‘मी राखीविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्यासाठी आलो होतो. जेव्हा राखी माझ्यावर खोटे आरोप करून १०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करू शकते. तर मी नक्कीच तिच्यावर गुन्हा दाखल करेल.’
Actress Rakhi Sawant Defamation Case Adil Durrani