मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राखी सावंत हिच्या नावाचा उल्लेख झाला की भला मोठा ड्रामा डोळ्यापुढे येतो. पण यावेळी राखी खरच एका कौटुंबिक समस्येत अडकल्याचे दिसत आहे. तिने आपल्या नवऱ्याविरुद्ध पोलिसांत तक्कार केल्यानंतर त्याला अटक झाली आणि इकडे त्याच्याविषयी बोलताबोलताच तिला पोलीस स्टेशनपुढे भोवळ आली. यावेळी राखी आपल्या मनातलं सगळं माध्यमांपुढे बोलत होती.
राखी सावंतचा नवरा आदिल खान दुर्रानी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याची तक्रार राखीने पोलिसांत केली होती. त्यानंतर ओशिवरा पोलिसांनी त्याला अटक केली. ओशिवरा पोलीस ठाण्यापुढे राखीला माध्यम प्रतिनिधींनी घेरलं आणि तिला बोलतं केलं. खरं तर राखीला माध्यमांपुढे बोल, असं सांगण्याची गरज नसते. ती तशीच बोलायला लागते. मात्र यावेळी बोलता बोलता तिच्या भावा अनावर झाल्या.
ती म्हणाली, ‘माझं हे दुसरं लग्न आहे. त्यामुळे लग्न टिकवण्यात मीच अपयशी ठरले, असे आरोप माझ्यावर होतील. म्हणूनच मी बदनामीच्या भितीने सारंकाही सहन करत राहिले. काहीच बोलले नाही.’ यावेळी वारंवार चुका करूनही आपण आदिलला माफ केले, असेही ती म्हणाली. आदिलला मी वारंवार माफ केले. आजपर्यंत ५० वेळा माफ केले असेल. पण तो सुधारला नाही. मी त्याच्यासोबत बेबी प्लानिंग केले होते. त्यासाठी एक छोटेसे अॉपरेशनही अलीकडेच करून घेतले. पण आदिलने माझा विश्वासघात केला आणि माझं आयुष्य उध्वस्त केलं, असंही ती म्हणाली.
तुझ्या जागी असते तर…
आदिलची आई त्याला दररोज माझ्याबद्दल वाईट बोलायची. ती आदिलला म्हणायची की मी तुझ्या जागी असते तर राखीला कधीच सोडून दिले असते, अशी आपबिती राखीने सांगितली. या दोघांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सातत्याने कुठल्या ना कुठल्या कारणाने दोघेही ट्रोल होत आहेत. आदिलने सुरुवातीला हे लग्न स्विकारण्यास नकार दिला होता. मात्र नंतर दोघेही एकत्र नांदायला लागले होते.
Actress Rakhi Sawant Collapse on Ground ahead Camera