इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बिनधास्त गर्ल राखी सावंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून तिचे चाहते चिंतेत आहेत. कारण या व्हिडिओमध्ये राखी रुग्णालयात डान्स करताना दिसते आहे. तिच्या हाताला ड्रीप आहे. मात्र, यातून राखीला नेमके काय झाले आहे, याचा काही उलगडा चाहत्यांना झाला नाही.
आता चाहत्यांची ही चिंता राखीने दूर केली आहे. एका वृत्तपत्राला तिने याची माहिती दिली. जुहूच्या क्रिटीकेअर रुग्णालयात आपल्यावर सर्जरी झाल्याचे राखीने सांगितले. माझ्या पोटात गर्भाशयाच्यावर एक गाठ होती. ही गाठ अनेक वर्षे जुनी होती. ती मला काढायची होती. पण काही ना काही कारणास्तव ते काम लांबणीवर पडले होते. पण, या गाठीमुळे मला फार त्रास होत होता. त्यामुळे अखेर मी ती काढण्याचा निर्णय घेतल्याचे राखी सांगते.
राखी आता आणखी दोन दिवस रुग्णालयात राहणार आहे. डॉक्टरांनी तिला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. शस्त्रक्रिया झाली असली तरी चाहत्यांना चिंतेचे काही कारण नाही. कारण तिचा बॉयफ्रेंड आदिल तिची काळजी घेतो आहे. रुग्णालयातही तो तिच्या सोबत होता.
राखीने शास्त्रक्रियेआधीच एक व्हिडीओ टाकला होता. या व्हिडिओत ती रुग्णालयात डान्स करताना दिसते आहे. डान्सचे मला प्रचंड वेड आहे. त्यामुळे मी डान्स करण्याचा चान्स कधीच सोडत नाही, अगदी रुग्णालयातही, असे राखी सांगते. यात तिचा बॉयफ्रेंड आदिलही आहे. राखी सध्या दुबईचा यंग बिझनेसमन आदिल दुर्रानी याला डेट करते आहे. तो नेहमीच तिच्या सोबत दिसतो.
Actress Rakhi Sawant Big Surgery Video