इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – विश्वसुंदरी आणि बॉलीवूडमधील गुणी अभिनेत्रींमध्ये प्रियांका चोप्राचे स्थान निर्विवाद आहे. प्रियंकाने नुकताच लखनऊमधील युनिसेफच्या ऑफिसचा दौरा केला. याशिवाय तिने कम्पोजिट स्कुल, औरंगाबाद आणि एका आंगणवाडी केंद्रालाही भेट दिली. तिथल्या लहान मुलांशी संवाद साधला. या संपूर्ण दौऱ्यात प्रियांका चोप्रा उत्तर प्रदेशातील मुलींच्या विरोधात होणारी हिंसा आणि भेदभाव संपवण्यासाठी युनिसेफने केलेल्या कामाचा आढावा घेताना दिसली. तर यावेळी लखनऊ शहरात ‘बॉयकॉट प्रियांका’चा ट्रेंड दिसला. यामागे प्रियांका लखनऊमध्ये आलेली येथील नागरिकांना अजिबात आवडलेली दिसत नाही.
युनिसेफ ही एक संयुक्त राष्ट्रांतर्गत येणारी एक संस्था आहे. यात गरीब, गरजू, लहान मुले, त्यांचे कुटुंब यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदतीचा हात दिला जातो. युनिसेफसाठी दौरा करताना प्रियांका चोप्राने एक व्हिडीओ शेअर केला. त्याने तिने सांगितलं कि “मी युनिसेफसाठी लखनऊमध्ये आलेय. मी खरंच लखनऊ दौऱ्याची वाट पाहत होते. बालपणीची काही वर्षे मी लखनऊतील शाळेत घालवली आहेत. इथे माझे नातेवाईक आणि मित्रपरिवार आहे आणि उत्तर प्रदेशातील महिला आणि मुलांसाठी ही जागा कशी चांगली ठरत आहे हे समजून घेण्याची मला उत्सुकता आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हे बदल कसे केले जात आहेत, हे मला प्रत्यक्षात पाहायचं आहे.
लैंगिक असमानतेमुळे संपूर्ण भारतामध्ये संधींमध्येही विषमता दिसते. याचा सर्वाधिक फटका मुलींना बसतो. मुलींना मिळणारी असमान वागणूक, हिंसाचार आणि भेदभाव थांबवण्यासाठी आम्ही युनिसेफच्या अनेक भागीदारांना भेटणार आहोत. दैनंदिन जीवनात त्यांना तोंड द्याव्या लागणाऱ्या आव्हानांबद्दल मी जाणून घेणार आहे. त्यावर उपाय शोधण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपायांची गरज आहे. मी जसे सांगते, स्त्रिया आणि मुली केवळ स्वत:चेच नव्हे तर त्यांच्या समुदायाचे चांगले भविष्य घडवण्याची गुरुकिल्ली आहेत, असेही प्रियांका म्हणते.
आव्हानांना तोंड देण्यासाठी तंत्रज्ञान हे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारत तंत्रज्ञान बदलात आघाडीवर आहे. युनिसेफ यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. यात ‘द पोषण’ ट्रॅकर हे ऍप आरोग्य आणि पोषणविषयक महत्त्वाच्या माहितीचा मागोवा ठेवण्यास मदत करते. राज्यातील १ लाख ८० हजार‘अंगणवाडी केंद्रांसाठी एका क्लिकवर बालक आणि मातांसाठीची ही माहिती उपलब्ध होते. बँकिंगबाबत मदत करणारी सखी, जी ग्रामीण आणि दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना मोबाईल एटीएम मशिनद्वारे नाविन्यपूर्ण बँकिंग सेवा प्रदान करते. जवळपास कोणतीही बँक नसताना जागेवरच रोख रक्कम उपलब्ध करून देण्यासाठी महिलांना काम दिले जाते. हे या “सखींना” खरेदी करण्याची क्षमता देते. हे तंत्रज्ञान त्यांच्या वयाची किंवा शिक्षणाची पर्वा न करता स्वीकारले जात आहे आणि मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणत आहे हे पाहणे खूप प्रेरणादायी होते. असे देखील प्रियंकाने आपल्या पोस्टद्वारे सांगितले आहे.
प्रियांका चोप्रा लखनऊमधील १०९० चौकात असताना तिला भेटण्यालाठी १०९० वुमेन पॉवर लाइनची भिंत ओलांडून एक तरुण आला होता. ज्याला नंतर अटक करण्यात आले असल्याचे समजते. याशिवाय प्रियांका चोप्राच्या लखनऊ दौऱ्याच्या विरोधात एक संघटनेनं संपूर्ण शहरात ‘नवाबांच्या शहरात तुझं स्वागत नाही.’ अशा आशयाचे पोस्टर लावले होते. याशिवाय गोमतीनगरमध्ये प्रियांका चोप्राच्या बॉयकॉटचे पोस्टर लावण्यात आले होते. मात्र हे सर्व का करण्यात आलं किंवा यामागे कोण आहे? याबाबत काहीच माहिती मिळालेली नाही. याचा आता पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
Actress Priyanka Chopra Protest Reason