इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तम अभिनेत्री, मॉडेल, गायिका अशी गुणी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राकडे पाहिलं जात. मिळालेली भूमिका प्रामाणिकपणे करण्याच्या गुणावरच तिने अनेक चित्रपट मिळवले. मात्र करिअरच्या सुरुवातीला तिला एका हिंदी चित्रपटात भूमिकेबद्दल विचारण्यात आलं तेव्हा मात्र तिने नकार देत रडायला लागली. या प्रकाराने दिग्दर्शक देखील गोंधळून गेले होते.
प्रियांकाचा जन्म जमशेदपूर बिहार इथला तर आई – वडील हे दोघेही भारतीय सैन्यात डॉक्टर होते. त्यामुळे त्यांची सतत बदली होत असायची. सतत इकडून तिकडे बदली होत असल्याने प्रियंकाला भारतीय संस्कृतीची ओळख झाली. प्रियंकाने ‘फेमिना मिस इंडिया’ स्पर्धेत भाग घेतला आणि तिच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली.
अभिनय क्षेत्रात आल्यावर तिने आपल्या भूमिकांना न्याय दिला. प्रियांकाचा ‘ऐतराज’ हा त्यापैकीच एक चित्रपट. या चित्रपटामध्ये तिने साकारलेली भूमिका अधिक लोकप्रिय ठरली. ‘ऐतराज’मध्ये प्रियांका आणि अक्षय कुमार यांनी एकत्र काम केलं. पण जेव्हा या चित्रपटासाठी दोघांनाही विचारण्यात आलं तेव्हा दोघेही हा चित्रपट करण्यास तयार नव्हते. याबाबत निर्माते-दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी खुलासा केला आहे. सुनील यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्रियांका-अक्षयच्या ‘ऐतराज’बाबत सांगितलं आहे.
ते म्हणाले, “अक्षय आणि प्रियांका दोघंही ‘ऐतराज’ चित्रपट करण्यास तयार नव्हते. प्रियांकाला या चित्रपटामधील भूमिकेसाठी जेव्हा मी विचारलं तेव्हा ती रडू लागली. त्याच विचारामध्ये प्रियांका घरी गेली. त्यानंतर माझ्या ऑफिसमध्ये येऊन मला भेट असं मी प्रियांकाला सांगितलं. तिला मी ‘ऐतराज’मधील तिच्या भूमिकेचं महत्त्व पटवून दिलं आणि हा चित्रपट करण्यासाठी प्रियांकाला तयार केलं.” आधी हा चित्रपट करण्यास प्रियांका तयार जरी नसली तरी तिने ‘ऐतराज’मध्ये काम करत स्वतःला अभिनेत्री म्हणून सिद्ध केलं. २००४मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या चित्रपटानंतर एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये प्रियांकाने काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
Actress Priyanka Chopra Cry Director Says
Entertainment Akshay Kumar Bollywood