इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्वातील कलाकारांना व्यवसायाची गरज म्हणून चित्रपटांचे प्रमोशन, इव्हेंट अशा खूपशा ठिकाणी हजेरी लावावी लागते. कधीतरी काही चूक होऊन त्यातून फजिती देखील होते. खरंतर अशी वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी येतेच. कॅमेऱ्याने कायम घेरलेल्या कलाकारांच्या बाबतीत ती मोठी बातमी होते. त्यामुळे अनेकदा फजितीला तोंड द्यावे लागते. असच काहीस अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या बाबतीत घडलं. याबाबत तिने आश्चर्य व्यक्त करत तो किस्सा स्वतःहून शेअर केला आहे.
प्रियंकाने सांगितला तो किस्सा
अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या स्टायलिश आणि बोल्ड लुकमुळे कायम चर्चेत असते. ‘मेट गाला’नंतर प्रियांकाने तिचा आगामी चित्रपट ‘लव्ह अगेन’च्या प्रीमियरसाठी रेड कार्पेटवर हजेरी लावली होती. यावेळी प्रियांकाने हॅरिस रिड याने डिजाइन केलेला ‘ब्लीच्ड डेनिम ड्रेस’परिधान केला होता. या ड्रेसमध्ये प्रियांका एखाद्या राणीसारखी दिसत होती. मात्र, हा ड्रेस खूप मोठा होता आणि त्यात प्रियांकाने हाय हिल्स घातल्यामुळे ती रेड कार्पेटवर पडली. या संपूर्ण प्रसंगाबाबत एका मुलाखतीत प्रियांकाने खुलासा केला आहे.
प्रियांका या मुलाखतीदरम्यान म्हणाली, “मी जेव्हा सर्व लोकांसमोर रेड कार्पेटवर पडले तेव्हा मला अगदीच लाजल्यासारखे झाले कारण, त्याठिकाणी असंख्य पापाराझी आणि पत्रकार उपस्थित होते. पण, एका गोष्टीमुळे अजूनही हैराण आहे. ती म्हणजे, त्यापैकी उपस्थित एकाही पापाराझीने कोणीही व्हिडीओ किंवा फोटो न काढता कॅमेरे खाली ठेवले. मी या प्रसंगाबाबत कुठेही बोलले नाही कारण, असे व्हिडीओ व्हायरल झालेले मी यापूर्वी अनेकदा सोशल मीडियावर पाहिले आहेत.”
https://twitter.com/ndtv/status/1656631152034172935?s=20
यांच्या माणुसकीला सलाम
प्रियांका पुढे म्हणाली, “मी या ड्रेससोबत प्रमाणापेक्षा जास्त उंच हिल्स घातल्या होत्या जेणेकरून मी परफेक्ट दिसेन परंतु रेड कार्पेटवर पडल्यावर काही मिनिटे मला काहीच सुचत नव्हते. मी रेड कार्पेटवर पडले त्याची एकही क्लिप सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेली नाही. सर्व पापाराझींनी केवळ बातमीचा विचार न करता ‘माणुसकी’ दाखवली आणि कॅमेरे खाली ठेवले.” मी माझ्या २३ वर्षांच्या करिअरमध्ये एकदाही असे पाहिले नव्हते.
Actress Priyanka Chopra Collapse on Red Carpet