ऍक्शन आणि रोमान्सचा तडका
इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडमधील अनेक कलाकार हे सोशल मीडियावर चांगलेच ऍक्टिव्ह असतात. आपल्या आयुष्यातील अनेक खास गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करायला त्यांना आवडतात. यातीलच एक अभिनेत्री प्रियांका चोप्रा. आपली लेक मालती हिच्यासोबतचे अनेक फोटोज प्रियांका सोशल मीडियावर सातत्याने टाकताना दिसते. यासोबतच प्रियांका आणखी एका कारणासाठी चर्चेत आहे. प्रियांकाच्या ‘सिटाडेल’ सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. २ मिनटे १६ सेकंदांच्या या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. या ट्रेलरला मिलियनमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत.
बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येदेखील अभिनेत्री प्रियांका चोप्राने विशेष ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच ‘सिटाडेल’ या स्पाय थ्रिरल सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा या सीरिजमधील लूक प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर आता ट्रेलरही रिलीज झाला आहे. प्रियांकाची ही हॉलिवूड वेब सीरिज प्रेक्षकांना ऍमेझॉन प्राइमवर बघता येणार आहे. सिटाडेल सीरिजचे पहिले दोन एपिसोड २८ एप्रिलला स्ट्रीम केले जाणार आहेत. तसेच या सीरिजचे बाकीचे एपिसोड २६ मेपासून रिलीज केले जातील. नुकताच सिटाडेल सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. सिटाडेलचा ट्रेलर पाहिल्यानंतर आता प्रेक्षक या सीरिजची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
सिटाडेलच्या ट्रेलरमध्ये प्रियांका चोप्राचा ग्लॅमरस अंदाज दिसत आहे. या वेब सीरिजमध्ये तिनं नादिया सिंह ही भूमिका साकरली आहे. नादिया ही गुप्तहेर आहे. प्रियांकानं या वेब सीरिजमधील तिच्या डायलॉग्सचं डबिंग स्वत: केलं आहे. सिटाडेलच्या ट्रेलरमध्ये प्रियांका आणि स्टेनलीची केमिस्ट्री प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. प्रियांकाच्या या हॉलिवूड वेब सीरिजची भारतात देखील क्रेझ आहे. तिचे जगभरातील चाहते या सीरिजची उत्सुकतेने वाट बघत आहेत. ही सीरिज जगभरातील २४० हून अधिक देशांमध्ये स्ट्रीम केली जाणार आहे. ही सीरिज हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये पाहणे शक्य होणार आहे.
सिटाडेल नावाची जागतिक गुप्तचर संस्था म्हणजेच स्पाय एजन्सी आठ वर्षांपूर्वी पूर्णपणे नष्ट झाली आहे. ही एजन्सी लोकांचे संरक्षण करत असे, परंतु मॅन्टीकोरने ती नष्ट केली होती. सिटाडेल नष्ट होताना मेसन केन (रिचर्ड मॅडन) आणि नादिया सिंह (प्रियांका चोप्रा जोनास) हे त्याचे प्रमुख एजंट आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाले आणि नवी ओळख निर्माण करून आयुष्य जगू लागले. परंतु एका रात्री बर्नार्ड ऑर्लिक (स्टॅनली टुसी), ज्याने पूर्वी मेसनबरोबर सिटाडेल इथं काम केले होते, तो त्याचा माग काढतो आणि सगळं अचानक बदलतं.
मॅसनला मॅन्टीकोरला थांबवण्यासाठी नादियाची गरज असते आणि इथून एका नव्या मिशनला सुरुवात होते, ही या वेबसिरीजची मध्यवर्ती भूमिका. सिटाडेल वेब सीरिजमध्ये अभिनेता रिचर्ड मॅडेन हा मेसन केन ही भूमिका साकारणार आहे. तर स्टेनली टुकी हा बर्नार्ड ऑरलिक तसेच यामध्ये अभिनेत्री लेस्ली मैनविल ही डाहलिया आर्चर या भूमिकेत दिसणार आहे.
On April 28, enter a new age of espionage. Watch the trailer for Citadel now! @CitadelonPrime #CitadelOnPrime pic.twitter.com/pvRh6QXMb3
— PRIYANKA (@priyankachopra) March 6, 2023
Actress Priyanka Chopra Citadel Movie Trailer Out Video