इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पाच वर्षांपूर्वी ‘ओरु अदार लव’ हा दाक्षिणात्य चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित झाले आणि त्यातील मुलीची चर्चा सुरू झाली. या गाण्यात शाळेतील एक मुलगी होती. तिने डोळा मारला होता. ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियर आहे. या सीनमुळे ती एकदम प्रसिद्धीच्या झोतात आली. आता पुन्हा एकदा हा सीन आणि त्या अनुषंगाने अभिनेत्री प्रिया चर्चेत आली आहे.
‘ती कल्पना माझीच’
‘ओरु अदार लव’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन सहा वर्षे उलटली असली तरी ‘विंक’ सीन आजही सर्वांच्या लक्षात आहे. प्रियाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये या सीनवर वक्तव्य केले आहे. तिने ‘विंक’ सीनची कल्पना कोणी दिली हे सांगितले आहे. ‘चित्रपटातील माणिक्य मलाराया गाण्यातील भुवया उडवण्याची कल्पना माझीच होती, असे प्रिया म्हणाली. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि दिग्दर्शक उमर लुलू यांनी एक पोस्ट लिहीत तिचा दावा खोटा ठरवला आहे. ते म्हणाले की, ‘हा सीन जेव्हा चित्रित झाला तेव्हा ती लहान होती. त्यामुळे तिला ते आता लक्षात नसेल. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मी तिला एक औषध सुचवतो, असे सांगत वल्ल्यचंदनादि हे आयुर्वेदीक औषधच सुचवले.’ लुलू यांनी प्रियाला हे औषध घेण्याचा सल्ला दिला आहे.
जुना व्हिडीओ व्हायरल
पाच वर्षांपूर्वी प्रियाने स्वत: एका मुलाखतीमध्ये हे कबूल केले होते की विंक सीनची कल्पना ही तिला दिग्दर्शकाने दिली होती. तिचा हा जुना व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
१०७ मिलियन व्ह्यूज
माणिक्य मलाराया पूवी गाण्याचा व्हिडिओ आतापर्यंत यूट्यूबवर १०७ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. प्रियाने अद्याप ओमर लुलूच्या पोस्टवर प्रत्युत्तर दिलेले नाही.
Actress Priya Prakash Varrier Viral Scene