इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रेक्षकांच्या मनोरंजनाच्या व्याख्या या कायम बदलत असतात. फारसे पर्याय नव्हते तेव्हा नाटक, छोट्या पडद्यावरील मालिका, याच पाहिल्या जात होत्या, त्या लोकप्रिय होत्या. पण कोरोना काळात हे सगळेच निकष बदलले आणि ओटीटीचे एक नवीन जग समोर आले. यावर येणाऱ्या नवनवीन विषयावरील वेबसिरीज, त्यातील वेगळे विषय, ते हाताळण्याची पद्धती, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या मोबाईल किंवा टॅबवर सहजपणे उपलब्ध होणाऱ्या या वेबसिरीज या सगळ्यामुळे हा प्रकार अल्पावधीतच लोकप्रिय ठरल्या. याची क्रेझ एवढी वाढली की, एरवी मालिकांमध्ये न दिसणारे चेहरे इथे दिसू लागले.
अतुल कुलकर्णी, सचिन पिळगांवकर अशा बड्या स्टारकास्टला घेऊन लवकरच ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या सिरीजचा तिसरा भाग आला आहे. यानिमित्त वेब सिरिजची संपूर्ण टीम त्याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ म्हंटले की प्रिया बापटच्या त्या सीनची चर्चा अपरिहार्य आहे. या तिसऱ्या भागाच्या प्रमोशनानिमित्त त्याची पुन्हा एकदा आठवण निघाली. यात प्रियाने समलैंगिक पात्राची भूमिका केली होती. एका मुलीला केलेल्या किसचा व्हिडिओ तेव्हा चांगलाच व्हायरल झाला होता.
अभिनेत्री प्रिया बापट म्हणते, लोकं उगाचच कशाचाही बाऊ करतात. एक अभिनेत्री म्हणून मला जी भूमिका आव्हानात्मक वाटेल ती मी करणारच. कथेची गरज म्हणून मी तो सीन केला, आणि त्यावरून बरीच ट्रोल झाले. खरं तर या सिरीजचा विषय राजकारण आहे. पण तो एकच सीन लोकं चघळत बसले. तेव्हा मला त्याचा फारच त्रास झाला. पण आता मला त्याचे काहीच वाटत नसल्याचे प्रिया सांगते.
Actress Priya Bapat on Lesbian Bold Scene