इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मराठी चित्रपट सृष्टीत नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रार्थना बेहरे. प्रार्थनाचा अभिनय आणि तिचा मराठमोळा लूक यामुळे ती कायम चर्चेत असते. प्रार्थनाने आपल्या पदार्पणातच ‘झी वाहिनी’वरील सुप्रसिद्ध ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेद्वारे आपल्या अभिनयाची झलक दाखवली होती. त्यानंतर 9x झकास वाहिनीवरील ‘हिरोईन हंट’ या कार्यक्रमाचीही ती विजेती होती. सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत ती काम करत आहे. या मालिकेत तिचे लग्न झाल्यानंतर ती कायम साडीत दिसते. तिचा साडीतील लूक घायाळ करणारा आहे. तिचे चाहते देखील तिच्या या लूकवर भलतेच खुश आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत माझ्या नवऱ्याला असं काही आवडत नसल्याचं प्रार्थनाने सांगितलं आहे.
‘एकापेक्षा एक सुंदर अशा साड्यांच्या लुकवर नवरा काय कॉम्प्लीमेंट देतो?’, असा प्रश्न एका मुलाखतीत प्रार्थनाला प्रश्न विचारण्यात आला. यावर ती दिलखुलास हसली. ‘मी रोज इतक्या साड्या नेसतेय, माझं काय चाललंय याबद्दल त्याला काही माहिती नसेल. आणि तसंही त्याला हे आवडत नसल्याचं प्रार्थनाने यावेळी सांगितलं. यानंतर तिने तिच्या आयुष्यातील महत्वाचा किस्सा देखील शेअर केला आहे.
ती म्हणाली, लग्नानंतर आम्ही पहिल्यांदा फिरायला गेलो होतो. लग्नानंतर लगेचच फिरायला जात असल्याने तेव्हा हातांवर मेहंदी असते, चुडा भरलेला असतो. पण, माझ्या नवऱ्याला काही हे आवडत नाही. त्यामुळेच आम्ही लग्न झाल्यानंतर १५ दिवसांनी फिरायला गेलो, असं प्रार्थना सांगते. आमचं लग्न झालं १४ नोव्हेंबरला झालं आणि आम्ही १ डिसेंबरला फिरायला गेलो. फिरायला जायच्या अगोदर अभिषेकने तिला विचारलं हातावरची मेहंदी पंधरा दिवसात जाईल का ? प्रार्थनाने हो म्हटल्यावर त्याने पंधरा दिवसानंतरच विमानाचं बुकिंग केलं. आणि आपण नवविवाहित, टिपिकल जोडप्यासारखं जायचं नाही असं देखील प्रार्थनाला सांगितलं. तेव्हा माझ्या नवऱ्याला असं काही आवडत नाही असं प्रार्थनाने सांगितलं आहे.
अभिषेक जावकरसोबत प्रार्थना बेहरेने १४ नोव्हेंबर २०१४ रोजी लग्नगाठ बांधली. अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे. अभिषेकने काही तेलगू चित्रपटांचे वितरण केलं आहे. मूळ ‘सिंघम’ चित्रपटाची निर्मितीही अभिषेकनेच केली आहे. जवळपास पाच वर्षांपूर्वी त्याने ‘रेड बल्ब स्टुडिओ’ज नावाची स्वत:ची निर्मितीसंस्था सुरु केली. ‘डब्बा ऐसपैस’, ‘शुगर, सॉल्ट आणि प्रेम’ या मराठी चित्रपटांची सहनिर्मिती त्याने केली आहे. ‘मिसिंग ऑन अ वीकेंड’ या हिंदी चित्रपटातून अभिषेकने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं.
Marathi Actress Prarthana Behere Says About his Married Life
Entertainment