इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मराठी चित्रपटसृष्टीतील एक सोज्ज्वळ, सुंदर आणि गुणी अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी ओळखली जाते. ती कायमच चर्चेत असते. नुकतीच ती ‘चंद्रमुखी’ चित्रपटात झळकली होती. त्यातील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. तसेच तिने स्वतःचा एक दागिन्यांचा ब्रँड देखील सुरू केला आहे. अशी ही सगळ्यांची लाडकी प्राजक्ता तिच्या नव्या फोटोशूटमुळे ट्रोल होते आहे.
काय आहे फोटोशूटमध्ये?
प्राजक्ताने नुकतंच एक फोटोशूट केले आहे. यात तिने सिल्व्हर अर्थात चंदेरी साडी परिधान केली आहे. या फोटोला तिने हटके कॅप्शन दिले आहे. “हुस्न-ओ-इश्क़ के दम से ज़माना, यही हक़ीक़त है बाक़ी फ़साना..” अशी कॅप्शन तिने या फोटोंना दिली आहे. मात्र, तिचे फोटोशूट पाहून नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.
नेटकऱ्यांच्या गमतीशीर कमेंट
“हे दम से जमाना वाटत नाही, बम से जमाना वाटते…बाकी मस्त”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने “सध्या सगळेच पाठ दाखवून फोटो का काढत आहेत ??? पाठदुखी कंबरदुखीवर काही इलाज शोधण्याचा ट्रेंड सुरू आहे का ??? आखिर दिखाना क्या चाहते हो? ” असा प्रश्न केला आहे. तर एकाने किती दिवस तेच फोटो टाकणार, अशी कॉमेंट केली आहे. तर एकाने “असे फोटो नका टाकू. बाकी लोकांमध्ये आणि आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये फरक राहू द्या”, असे सांगितले आहे. त्याबरोबरच एकाने “ताई तुमची फिगर नाही चेहरा आवडतो आम्हाला”, असे म्हटले आहे.
Actress Prajakta Mali Troll Social Media