इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान पटकावले आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील तिची येसूबाईची भूमिका चांगलीच गाजली. येसूबाई म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात ती लोकप्रिय झाली. प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या वैयक्तिक गोष्टी ती नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता प्राजक्ताने तिच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.
थांबा, तुम्हाला वाटते तशी ही गुड न्यूज नाही. तर प्राजक्ताने नुकतंच नवं घर घेतलं आहे. तिने या घरात प्रवेश केला आहे. घरातील गृहप्रवेश आणि सत्यनारायणाची पूजा याचा एक व्हिडिओही तिने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
काही महिन्यांपूर्वी झाली होती वास्तूशांती
काही महिन्यांपूर्वी प्राजक्ताने या घराची वास्तुशांती केली होती.. त्यानंतर घराच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. आता हे घर बांधून पूर्ण झालं आहे. प्राजक्ता तिच्या संपूर्ण कुटुंबासह या घरात राहायला आली आहे. या घराच्या सत्यनारायण पूजेचा व्हिडिओ तिने शेअर केला आहे. या व्हिडिओत प्राजक्ता पूजेचा कलश डोक्याला लावताना दिसतेय.
तिचं हे नवीन घर अतिशय सुंदर सजवण्यात आलं आहे. पांढरा आणि चॉकलेटी अशा रंगांची निवड घर सजवण्यासाठी करण्यात आली आहे. घराचे दरवाजेही लाकडी आहेत. तिच्यावर आता चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्राजक्ताला नेटकरी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Actress Prajakta Gaikwad New Home Video