इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क – प्रसिद्ध अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा यांना न्यायालयाने ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. चेन्नई येथील रायपेटा येथे असलेल्या मालकीच्या चित्रपटगृहातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याविरोधा याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. याशिवाय प्रत्येकाला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
जया प्रदा यांच्या मालकीचे चित्रपटगृह असून हे चित्रपटगृह राम कुमार आणि राजा बाबू चालवतात. चित्रपटगृहात काम करणाऱ्या कामगारांना ईएसआय देण्यास व्यवस्थापन अपयशी ठरल्यामुळे वाद निर्माण झाला होता. दरम्यान, कामगारांनी न्यायालयात धाव घेत याप्रकरणी याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायालयाने हा निकाल दिला.
जया प्रदा यांच्याकडून कामगारांना पूर्ण रक्कम देण्याचे आश्वासन देऊन याचिका फेटाळण्याची विनंती करण्यात आली होती. परंतु कामगार सरकारी विमा महामंडळाच्या वकिलांनी त्यांच्या याचिकेवर आक्षेप घेतला. यानंतर सुनावणी करताना न्यायाधीशांनी जया प्रदा आणि या प्रकरणाशी संबंधित इतर तिघांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तसेच प्रत्येकाला पाच हजार रुपये दंड भरण्यास सांगितले आहे.
actress politician jayaprada chennai court punishment