मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राजभवनावर कार्यक्रमासाठी गेलेल्या महिलांच्या शिष्टमंडळातील एका महिलेने राज्यपालांच्या खुर्चीसोबत फोटो काढल्याचे समोर आले आहे. छोट्या पडद्यावरील अभिनेत्री असलेल्या या महिलेने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकताच ते व्हायरल झाले. असे फोटो व्हायरल झाल्याचे राजभवन अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी नाराजी तर व्यक्त केलीच शिवाय; या अभिनेत्रीला समजही दिली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी एका सामाजिक संस्थेच्या महिलांचे शिष्टमंडळ राजभवनवर गेले होते. या महिलांबरोबर छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मायरा मिश्रा होती. कोश्यारी दालनात येण्यापूर्वीच तिने मोबाइलमधून राज्यपालांच्या खुर्चीसोबत काही फोटो काढले. त्यानंतर ते फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकले. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाल्यानंतर राजभवनच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट आली. या प्रकरणावर राजभवनाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. राज्यपालांच्या भेटीआधी मोबाईल फोन बाहेर ठेवावेत, असा नियम असतानाही तो मोडण्यात आला. परस्पर मोबाइलवरून फोटो काढण्यात आल्याने राजभवनातील अधिकाऱ्यांनी अभिनेत्रीसह शिष्टमंडळातील महिलांना समज दिल्याचे समजते.
कोण आहे मायरा मिश्रा?
मायरा मिश्रा ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. एमटीव्ही स्प्लिट्सविलाच्या ११ सीझनमध्ये भाग घेतल्यानंतर मायरा मिश्रा चर्चेत आली. उत्तर प्रदेशमध्ये जन्म झालेल्या मायराने छोट्या पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशोका, उडाण, बहू बेगम आणि भंवरसारख्या टीव्ही मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत. मायराचं आईएस अधिकारी बनण्याचं स्वप्न होतं, पण लहानपणापासून तिला अभिनयाचीदेखील आवड होती. अभिनयातच आपले करीअर करण्याचा निर्णय तिने घेतला.
https://twitter.com/priyankac19/status/1600705925399994369?s=20&t=3xkKrP_3Qr1gDnboC00Yyw
Actress Photo Session with Governor Chair Controversy