मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टिव्हीवर नेहमी अनेक प्रकारचे सुरू असतात, त्यापैकी कंगना राणौतचा शो लॉक अप कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. कधी शोमधील स्पर्धकांमध्ये वाद झाल्याने प्रकरण तापते, तर कधी कंगना स्पर्धकांना फटकारताना दिसते. त्याच वेळी, शोमध्ये उपस्थित सेलिब्रिटी देखील त्यांच्या गत आयुष्याशी संबंधित खुलासे करत असतात.
अलीकडेच, शोची स्पर्धक व अभिनेत्री पायल रोहतगीने सांगितले होते की, तिने आपले करियर वाचवण्यासाठी एकेकाळी वशिकरण प्रक्रियेचा अवलंब केला होता, तेव्हापासून सर्वत्र एकच चर्चा आहे की, पायलने असे का केले? अशा परिस्थितीत आता पायलचा होणारा पती म्हणजेच मंगेतर संग्राम सिंह याने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
पायल ढोंगी पंडिताच्या जाळ्यात अडकली : पायलच्या कबुली जबाबावर संग्राम सिंहचे वक्तव्य आले आहे. संग्राम म्हणाला, ‘ एका नातेवाईकाने पायलची ओळख एका भोंदू पंडिताशी करून दिली होती. ही पूजा करून दाखवलीस तर तुझी सर्व कामे सुरळीत होतील, तसेच जर तुम्ही ही पूजा कराल तर तुम्ही हे चित्रपट देखील यशस्वी कराल. तुम्ही मला त्या प्रोडक्शन हाऊसची नावे द्या, मी त्यांना मोहित करीन म्हणजे तिथून तुम्हाला फोन येऊ लागतील. पायलचा विश्वास बसेल, असे आश्वासन त्यांनी पायलला दिले होते.
माझा श्रद्धेवर विश्वास : संग्राम पुढे म्हणाला, ‘त्या तांत्रिकानेही माझ्याबद्दल सांगितले की हा मुलगा तुझ्यासाठी योग्य नाही. पण त्यानंतर चुकून तो पंडित भेटला तेव्हा मी त्याला म्हणालो- तुला तुझेच भविष्य माहीत नाही, तू पुढे इतरांबद्दल काय सांगशील. मी त्याला खूप शिव्या दिल्या आणि सगळे प्रकार बंद करून टाकले. आता पायलचा या सर्व गोष्टींवर विश्वास नसून कुटुंबातील एका मोठ्या सदस्यामुळे तिने हे केले, मी तिला सांगितले की, मला तुझ्या भावनांची कदर आहे. माझा श्रद्धेवर विश्वास आहे, पण अंधश्रद्धेवर नाही.
कठोर परिश्रम करतात, ते यशस्वी होतात: संग्राम पुढे सांगतो की, ज्यांचे हात कमकुवत असतात, ते काळ्या जादूवर अवलंबून असतात आणि अंगठ्या घालत असत. मात्र मेहनत केली, तर तुम्हाला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्यानंतर पायलला हे प्रकरण समजले आणि हे सर्व थांबले. पण ती निर्दोष आहे, मात्र तिच्यावर कोणाचा तरी प्रभाव पडला आहे. पण ती तिच्या कामावर विश्वास ठेवून मेहनत करते.
पायल काय म्हणाली? : विशेष म्हणजे, लॉकअपमधील स्पर्धक टास्क अंतर्गत स्वतःबद्दलचे एक रहस्य उघड करतात. आतापर्यंत तहसीन पूनावाला, साईशा शिंदे, करणवीर बोहरा, अंजली अरोरा आणि निशा रावल यांनी त्यांच्या आयुष्यातील धक्कादायक रहस्ये सांगितली आहेत. आता पायल रोहतगीनेही धक्कादायक खुलासा केला आहे. स्वतःला अपयशापासून वाचवण्यासाठी पायल म्हणाली, ‘मी 15 वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे. एक काळ असा होता की, माझे करिअर चांगले चालत नव्हते. माझे करियर पुढे नेण्यासाठी मी तांत्रिक पूजा करायची. मी वशिकरणही केले. मात्र, या सगळ्याचा फायदा झाला नाही.