इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राजकारणी, क्रिकेटपटू आणि बॉलीवूडमधील अभिनेते – अभिनेत्रींचे नातेसंबंध हे काही नवीन नाहीत. त्यांच्या जोड्या या सातत्याने जुळत असतात, चर्चेत असतात आणि त्या लोकांना भावतात देखील. अशीच एक जोडी सध्या चांगलीच चर्चेत आहे. अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांचे नाते काही कोणापासून लपून राहिलेले नाही. लवकरच ते साखरपुडा करणार असल्याची बातमी आहे. या दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. आणि या व्हिडिओतील घोषणा ऐकून परिणितीच्या चेहऱ्यावरील हसू काही लपताना दिसत नाही.
“परिणीती भाभी जिंदाबाद”च्या घोषणा
सध्या आयपीएल सुरू आहे. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज हा सामना नुकताच पार पडला. पंजाब क्रिकेट असोसिएशन येथे झालेल्या या सामन्याला राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा हे दोघेही मोहालीमध्ये पोहोचले होते. त्यांचा स्टेडियममधला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या दोघांना एकत्र पाहून चाहते ‘परिणीती भाभी जिंदाबाद’च्या घोषणा देताना चाहते दिसले. चाहत्यांच्या या घोषणाबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्राला ‘परिणीती भाभी जिंदाबाद’चे नारे ऐकून आपले हसू आवरता आले नाही. हे ऐकून परिणीतीने तर डोक्यालाच हात लावला.
It’s in public now♥️
MP Raghav Chadha & Actress Parineeti Chopra spotted watching IPL 2023 game in Mohali….@raghav_chadha @ParineetiChopra pic.twitter.com/g02knMx4Su— Meena Joshi ( #IStandWithKejriwal ) (@MeenaJoshi_) May 3, 2023
महिन्याभरापासून चर्चांना ऊत
अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या चांगल्याच चर्चा सुरू आहेत. महिनाभरापूर्वी ते मुंबईत एकत्र दिसले होते, तेव्हापासून त्यांच्या अफेअरबाबत बोललं जातंय. या चर्चा सुरू असतानाच हे दोघे आयपीएलचा सामना पाहायला स्टेडियममध्ये एकत्र दिसले. राघव – परिणीतीला एकत्र पाहून क्रिकेट चाहत्यांनी स्टेडियम दणाणून सोडलं. दरम्यान, हे दोघे १३ मे रोजी साखरपुडा करणार असून ऑक्टोबरमध्ये लग्नगाठ बांधतील अशी चर्चा आहे, पण त्यांनी याबद्दल अधिकृत भाष्य केलेलं नाही.
Actress Parineeti Chopra MP Raghav Chaddha Video Viral