इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अलीकडे मनोरंजन विश्वात सातत्याने लग्नाचे सनई चौघडे वाजताना दिसतात. कोरोनामुळे मुहूर्त हुकलेली अनेक जोडपी असल्याने सध्या बॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणात मंगलकार्ये होत आहेत. त्यात बॉलीवूमधील कपल म्हटल्यावर चर्चा तर होणारच. बॉलीवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा हे दोघेही चर्चेत आहेत.
काही दिवसांपासून ते दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या दोघांनीही त्यांच्या नात्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब केलेले नाही. त्यातच आता परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याची बातमी समोर आली. तर त्यानंतर लवकरच हे दोघे विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे.
महत्त्वाकांक्षी अभिनेत्री म्हणून परिणिती चोप्राची ओळख आहे. अनेक चांगले चित्रपट तिने बॉलीवूडला दिले आहेत. त्यापैकी अनेक भूमिका तिने चांगल्या वठवत त्या भूमिकेला न्याय दिला आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा हे कपल चर्चेत आहे.
नुकतेच दोघेही दिल्लीसाठी एकत्र रवाना झाले. हे दोघेही एकाच गाडीने विमानतळावर पोहोचले होते. त्या दोघांचा एक व्हिडीओही समोर आला आहे. यावेळी परिणितीने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर राघव चड्ढा काळ्या रंगाच्या शर्टात दिसले.
सज गया दुल्हन का घर…
राघव चड्ढा और परिणीति चोपड़ा की सगाई की खबरों के बीच सजाया गया परिणीति चोपड़ा का घर। #ParinitiChopra #RaghavChadha #Bollywood #ParinitiHouse pic.twitter.com/mCwaAmEAxR
— Journalist pulkit saxena (@Pulkitsaxena014) May 12, 2023
परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याची तारीख समोर आली आहे. येत्या १३ मे रोजी हे दोघेही साखरपुडा करणार असल्याची चर्चा आहे. त्या दोघांच्या साखरपुड्याची जय्यत तयारी सुरू आहे. परिणिती आणि राघव दिल्लीत साखरपुडा करणार आहे. या साखरपुड्यासाठी १५० लोकांना आमंत्रण देण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित राहतील. त्यांच्या साखरपुडा समारंभात सकाळी सुखमणी साहिबचे पठण केले जाईल. त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या हातात अंगठी घालत साखरपुडा करतील.
दरम्यान, परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघे कधी लग्नबंधनात अडकणार याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण या वर्षाच्या अखेरीस हे दोघेही विवाहबंधनात अडकू शकतात, अशी चर्चा आहे. अद्याप त्यांनी अधिकृतरीत्या याबदद्ल कोणतीही माहिती दिलेली नाही.
शुरू हुई परिणीति-राघव की सगाई की तैयारियां, सज गया एक्ट्रेस का घर, देखें वीडियो #ParineetiChopra #RaghavChadha #ATDigital pic.twitter.com/6AMDNZcbcr
— AajTak (@aajtak) May 12, 2023
Actress Parineeti Chopra AAP Leader Raghav Chadha Wedding Ceremony