इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सेलिब्रिटीजना घेऊन आपले रिॲलिटी शोज हिट करायचे एक नवीन टेक्निक मालिका निर्मात्यांनी शोधले आहे. अनेक रिॲलिटी शो मध्ये म्हणूनच सेलिब्रिटी दिसत असतात. काही शो हे तर केवळ सेलिब्रिटींना घेऊनच केले जातात. ‘बिग बॉस’ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. याच पठडीतला आणखी एक शो म्हणजे ‘खतरों के खिलाडी’. कार्यक्रम हिट होण्यासाठी या सेलिब्रिटींना जीवावर बेतणारे अनेक स्टंट करावे लागतात. अशाच एका स्टंटमध्ये अभिनेत्री नायरा बॅनर्जी गंभीर जखमी झाली आहे. त्यामुळे ती हा शो सोडणार असल्याची चर्चा आहे.
केपटाऊनमध्ये सुरू आहे चित्रीकरण
‘खतरों के खिलाडी’ सीझन १३ चे चित्रीकरण केपटाऊनमध्ये सुरू आहे. कार्यक्रमाच्या नावातच खतरा असल्याने रोहित शेट्टी सर्व स्पर्धकांना एकाहून एक साहसी स्टंट करायला लावत आहे. हे स्टंट करताना स्पर्धकांना मात्र घाम फुटतोय. नायराला या टास्कमध्ये पाण्याचा स्टंट दिला होता. यादरम्यान ही दुखापत झाली आहे.
पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, नायरा बोटीवर होती आणि स्टंटसाठी तिला या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायचे होते. यादरम्यान अनेक अडथळे आले. तरीही नायराने जिद्दीने हा टास्क पूर्ण केला. यावेळी तिने कोणतेही सेफ्टी पॅड घातले नव्हते. ना लांब मोजे ना गुडघ्यावर कुठलाही बँड. परिणामी, तिच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आणि अभिनेत्रीने त्या जखमेचा फोटो शेअर केला आहे. जखमा झाल्याने नायराचे गुडघे सोलवटून निघाले आहेत.
हे कलाकार माघारी
आजवर अनेकांना गंभीर जखमा झाल्या आहेत. याआधी रोहित रॉय दुखापतीमुळे मुंबईत परतला आहे. ऐश्वर्या शर्मा, अरिजित तनेजा यांच्यानंतर आता नायरा बॅनर्जीही जखमी झाली आहे. नायराने तिला झालेल्या दुखपतीचा फोटोही तिने शेअर केला आहे.
Actress nyrraa banerjee Injured Shooting