मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई ही मायानगरी असून त्याचप्रमाणे बॉलिवूड म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टी देखील मोठी मायावी सृष्टी आहे, असे म्हटले जाते. यात चित्रपट क्षेत्राचे अनेकांना आकर्षण असते. अनेक राज्यातील हजारो तरुण-तरुणी येथे नशीब आजमावण्यासाठी येतात. इतकेच नव्हे तर परदेशातील तरुणी मोठ्या अपेक्षा घेऊन हिरोईन बनण्यासाठी बॉलिवूडमध्ये पदार्पण करतात. परंतु त्यांना मोठ्या संघर्षाला तोंड द्यावे लागते त्यापैकी एक म्हणजे नोरा फतेहा ही अभिनेत्री होय.नोरा फतेही कॅनडातून भारतात आली तेव्हा तिच्याकडे फक्त पाच हजार रुपये होते, पण ती आज एक यशस्वी अभिनेत्री झाली आहे, कसा घडला तिचा जीवन प्रवास जाणून घेऊ या..
बॉलीवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीने स्वत:साठी एक मोठे स्थान निर्माण केले आहे. नोरा फतेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि चाहत्यांना तिचे फोटो आणि व्हिडिओ खूप आवडतात. नोरा फतेहीच्या पोस्ट अनेकदा व्हायरल होतात. नोरा फतेहीच्या वाढदिवसाच्या खास निमित्त, तिच्या संघर्षाबद्दल माहिती करून घेऊ या. 2014 मध्ये नोरा फतेहीने ‘रोर’ या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. यानंतर नोरा सलमान खानच्या बिग बॉस शोच्या 9 व्या सीझनमध्ये दिसली. या शोनंतर तिला प्रसिद्धी मिळाली. बिग बॉसनंतर नोराने 2016 मध्ये झलक दिखला जा या डान्स रिअॅलिटी शोमध्येही आपली कला दाखवली. कारण नोरा एक उत्तम डान्सर तर आहेच पण तिचा मार्शल आर्ट्सचा ट्रेंडही आहे. नोराने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिने उदरनिर्वाहासाठी कॉफी शॉपमध्येही काम केले होते.
नोराने लॉटरी लॉटरीची तिकिटे टेलिकॉलर म्हणून विकली. नोराने ते काम फक्त 6 महिने केले. एका मुलाखतीत नोरा म्हणाली होती की, ‘मी सुरुवातीपासूनच खूप फिल्मी होते, असे अनेक प्रसंग आले होते, जेव्हा बाकीच्यांना मागे टाकून मी स्वतः पुढे येत असे.’ मला माझ्या आयुष्यात काहीतरी मोठे आणि चांगले करायचे होते. मी याबद्दल खूप वेळा विचार केला, पण कधीच स्वतःसाठी निर्णय घेऊ शकले नाही, पण एकदा मी खूप विचार केला आणि शेवटी मी सर्व सोडले. कारण त्यावेळी मी वेगवेगळ्या ठिकाणी काम करायचे. नोरा पुढे म्हणाली, ‘मी त्यावेळी मॉडेलिंग व अॅक्टिंग एजन्सीबद्दल गुगल सर्च करायचे आणि मला जो काही नंबर मिळेल त्यावर कॉल करायचे.
एके दिवशी मला एका पाक रेडिओ चॅनलवर शो बिझबद्दल बोलणारी जाहिरात ऐकायला मिळाली, त्यानंतर मी तिथे गेले, जिथे माझी निवड झाली, मात्र त्यांनी की सर्व खर्च स्वतःच करायचा असे सांगितले. मात्र मी पोर्टफोलिओ दाखवायच्या आदल्या दिवशी, माझे अपेंडिक्सचे ऑपरेशन देखील झाले होते, मला नीट चालता येत नव्हते, पण मी तेथे गेले, मात्र तिथे निवड झाल्यानंतर मी लगेच जाण्यास नकार दिला, कारण मला प्रेरणा मिळत नव्हती. त्यानंतर मी भारतात आले. जेव्हा मी येथे पोहोचले तेव्हा माझ्यासाठी असे काही नव्हते, माझ्यासाठी ती एक मोठी थप्पड होती. या मुलाखतीदरम्यान नोराने असेही सांगितले की, संघर्षादरम्यान तिला गुंडगिरी, आघात आणि नकार यासारख्या परिस्थितींचा सामना करावा लागला.
मुलाखतीत नोरा म्हणाली होती, माझा पासपोर्ट चोरीला गेला, अनेक लोक माझ्या चेहऱ्यावर हसत, माझ्या बोलण्याच्या पद्धतीची खिल्ली उडवत, माझ्यासोबत असे बरेचदा घडले, मी अनेक वेळा रडत बाहेर पडायचे आणि रिक्षाने घरी जायचे. माझ्या बाबतीत जवळपास पाच वर्षे असे घडत होते की, तेव्हा जवळचे मित्र म्हणायचे की, बघ तू खूप हुशार आहेस. नशिबाचा हा दरवाजा फक्त तुझ्यासाठीच खुला आहे, पण मी त्या दरवाजाजवळ गेल्यावर कोणीतरी जोरात ते बंद केले तर माझे तोंड फुटेल, असे वाटायचे. मुलाखतीच्या शेवटी नोरा रडली आणि म्हणाली की, मी खूप काही पाहिले, खूप सहन केले, पण मी हार मानली नाही आणि प्रयत्न करत राहिले. पण माझ्यासारख्या अनेक समस्यांना तोंड देणाऱ्या मुलींचा विचार करून मला रडू येते. या क्षेत्रात अनेकांनी अयशस्वी होण्याचा प्रयत्न केला, काहींनी हार मानली पण काही टिकून राहिल्या. मला फक्त कोणीही हार मानू नये असे वाटते, कारण जेव्हा एक माणूस हरतो तेव्हा संपूर्ण मानवता हरते.