इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेत्री निशा रावल आणि करण मेहरा यांच्यात जवळपास १४ महिन्यांपासून वाद सुरू आहेत. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या लोकप्रिय मालिकेत नैतिकची भूमिका साकारणाऱ्या करणवर निशाने गंभीर आरोप केले होते. त्यानंतर करणने महिन्याभरापूर्वी पत्रकार परिषद घेऊन निशावर गंभीर आरोप केले. चुलत भाऊ रोहित सेठियासोबत तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप त्याने केला. यासह करण एका कटाचा बळी ठरत असल्याचे त्याने सांगितलं होत. तर दोघांमध्ये मुलावरून सध्या वाद सुरू आहेत. अशात अनेक गंभीर आरोप करणाऱ्या करणविरोधात निशाने नवा आरोप केला आहे.
निशा म्हणाली की, “आम्हा दोघांचं समुपदेशन करण्यात आलं होतं, असं निशाने सांगितलं आहे. तेव्हा डॉक्टरांनी त्याला विचारलं होतं की, तुला तुझ्या मुलाला भेटायला आवडत नाही का? त्याने माझ्या मुलाची भेट घेतल्यास माझी काहीच हरकत नाही. पण त्यालाच मुलाला भेटायचं नाहीये. त्याला मुलाचं संपूर्ण पालकत्व हवं आहे. त्याने डॉक्टरांना सांगितलं की त्याच्याकडे सध्या कामच नाही. अशा परिस्थितीत तो मुलाची काळजी कशी घेईल? त्याला फक्त त्याच्या अहंकारासाठी मुलाचा वापर करायचा आहे”, असं निशा म्हणाली.
करणच्या आरोपांवर निशा म्हणते, “ऑगस्टमध्ये मी करणविरोधात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. त्याला फेब्रुवारी आणि मार्चमध्येही समन्स बजावण्यात आले होते. पण तो आला नाही. त्याला कायदा आणि न्याय व्यवस्थेविषयी अजिबात आदर नाही. तो घरात घुसून कविशला भेटू नये म्हणून मी त्याच्याविरुद्ध आदेश काढले होते. गेल्या जूनपासून कविशचा खर्च कसा उचलला जातोय, हे बघायलाही तो कधी आला नाही. तो त्याचाही मुलगा आहे. पण करणला त्याची अजिबात चिंता नाही.”
रोहित सेठियासोबतच्या नात्याबद्दल निशाने सांगितलं, “मी याविषयी कोणालाच उत्तर देणार नाही. आम्ही दोघं तरुण आहोत. ब्रेकअपनंतर मी माझ्या आयुष्यात काय करते त्याने कोणालाच फरक पडू नये. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काय करतो हा त्याचा विषय आहे. प्रत्येकाचे स्वतःचं वैयक्तिक आयुष्य असतं आणि आम्ही एकमेकांना जबाबदार नाही.” असे म्हणत या विषयावर तिने पूर्णविराम दिला आहे.
Actress Nisha Rawal Extra Marital Affair Karan Mehra Controversy
Entertainment TV Industry
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी
खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD