इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील सर्वाधिक टीआरपी मिळणार कार्यक्रम म्हणजे कोणताही रिऍलिटी शो. त्यातही ‘बिग बॉस’ हा तर प्रेक्षकांचा अत्यंत आवडता कार्यक्रम आहे. म्हणूनच मूळ हिंदीत असलेला हा कार्यक्रम आता मराठीतही सुरू झाला आहे. आणि मराठीतही तो तेवढाच लोकप्रिय आहे. बिग बॉस हिंदीचं १६ वं पर्व नुकतंच संपलं आहे. या पर्वत सहभागी झालेल्या कलाकरांना आता मोठ्या ऑफर्स येत आहेत. तसं तर यात काही विशेष नाही. अशा ऑफर्स येतातच. पण, एखाद्या मोठ्या निर्मात्याकडून आलेली ऑफर नाकारणे हे नक्कीच विशेष आहे. अभिनेत्री निमृत कौर अहलुवालियाने निर्माती एकता कपूर हिची ऑफर नाकारली आहे.
बिग बॉसचं १६ वं पर्व संपून आठवडा झाला. यातील स्पर्धकांमुळे हे पर्व खूप गाजलं. बिग बॉस संपताच यातील अनेक स्पर्धकांना बड्या प्रोजेक्टच्या ऑफर येत आहेत. प्रसिद्ध निर्माती एकता कपूरने निमृत कौर अहलुवालियाला एका मोठ्या कार्यक्रमाची ऑफर दिली होती. पण निमृतने मात्र एकता कपूरची ही ऑफर नाकारल्याचं समोर आलं आहे.
बिग बॉस १६ मधील स्पर्धक हे अनेकदा बॉलीवूड चित्रपट किंवा काही लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमांमध्ये झळकतात. निर्माती एकता कपूरदेखील तिच्या ‘लॉक अप’च्या आगामी सीझनसाठी स्पर्धकांच्या शोधात आहे. याच कार्यक्रमासाठी तिने निमृतला विचारणा केली होती. मात्र निमृतने याला स्पष्ट नकार दिला. निमृतने थेट एकता कपूरची ऑफर नाकारल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काहींच्या म्हणण्यानुसार नुकतीच बिग बॉस मधून बाहेर आलेल्या निमृतला पुन्हा एकदा रिऍलिटी शो मध्ये सहभागी व्हायचे नाही. त्यामुळेच तिने हा निर्णय घेतला आहे. ‘लॉक अप’च्या आगामी सीझनमध्ये बिग बॉसमधील अनेक स्पर्धक दिसतील अशी चर्चा आहे. सध्या निमृतने या कार्यक्रमाला जरी नकार दिला असला तरी लवकरच ती ‘लव्ह सेक्स और धोखा २’ या चित्रपटात झळकणार आहे.