मुंबई – अभिनेत्री नेहा धुपिया हिने पुन्हा एकदा गुडन्यूज दिली आहे. ती दुसऱ्यांदा आई होणार आहे. तशी माहिती स्वतः नेहानेच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करुन दिली आहे. या फोटोमध्ये ती प्रेग्नंट असल्याचे दिसते आहे. सोबत तिचा पती अंगद बेदी आणि कन्या मेहर हे सुद्धा आहेत. नेहाने अंगद याच्यासोबत मे २०१८ मध्ये लग्न केले. त्यानंतर त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात तिने गोंडस कन्येना जन्म दिला. त्यानंतर आता पुन्हा एकदा नेहा प्रेग्नंट आहे. अंगद आणि नेहा या दोघांनाही आपल्या दुसऱ्या बाळाची उत्सुकता आहे. तसे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.