इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्वातील अभिनेते किंवा अभिनेत्री यांना स्वतःच्या दिसण्याबद्दल खूपच सजग राहावे लागते. यासाठी अत्यंत महागड्या ब्युटी उत्पादनांच्या वापरापासून स्वतःच्या डाएटवर लक्ष देणे त्यांना गरजेचे आहे. अभिनेत्री नेहा धुपिया मात्र, यासाठी पारंपरिक साधनांचा देखील वापर करताना दिसते. तिच्या आईने सांगितलेला खोबरेल तेलाच्या वापराचा उपाय ती आवर्जून करते. कोरड्या त्वचेच्या समस्या, चेहऱ्यावरील पिंपल, तसेच डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी याचा उपयोग होतो.
माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री नेहा धुपिया नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखली जाते. आपले हे नैसर्गिक सौंदर्य जपण्यासाठी ती फारच काळजी घेते. आणि यासाठी तिचा विश्वास महागड्या सौंदर्य उत्पादनावर नाही तर आईने सांगितलेल्या नैसर्गिक उपायांवर आहे. वास्तविक, अभिनेत्री आपल्या सौंदर्यासाठी परदेशी सौंदर्य उत्पादनांचा वापर करत असतील, असा समज असतो. पण, नेहा धुपिया या समजाला अपवाद ठरवते.
तिच्या मते सौंदर्याची नैसर्गिकरित्या काळजी घेता येते आणि त्यासाठी खोबऱ्याचं तेल प्रभावी उपाय आहे. त्वचा तुकतुकीत ठेवण्यासाठी खोबरेल तेलच वापरते. खोबऱ्याचं तेल हे सगळ्यांच्या घरात सहज मिळत असले तरी सौंदर्य समस्यांवर उपाय मात्र बाहेर शोधले जातात. खरं तर खोबरेल तेल इतकं बहुगुणी आहे की केसांपासून पायापर्यंत प्रत्येक गोष्टीत त्याचा उपयोग होऊ शकतो. चेहेऱ्याची नाजूक त्वचा जपण्यासाठीही खोबऱ्याचं तेल वापरता येतं. कोरड्या त्वचेच्या समस्या, चेहेऱ्यावरील ब्लॅक हेड्स आणि डोळ्यांखालील काळी वर्तुळं घालवण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा विशिष्ट पध्दतीनं उपयोग करता येतो.
https://twitter.com/NehaDhupia/status/1565997581187964928?s=20&t=hinECmv7zkFeYrr2B_unfA
खोबरेल तेलाचे काही उपाय आपण पाहू
– डोळ्याखालची काळी वर्तुळं घालवण्यासाठी
– खोबऱ्याचं तेल नैसर्गिक माॅश्चरायझर म्हणून ओळखलं जातं. चेहेऱ्यावर असलेले काळे डाग, डोळ्याखालची काळी वर्तुळं घालवण्यासाठी खोबऱ्याचं तेल हा उत्तम उपाय आहे.
– ब्लॅक हेड्स घालवण्यासाठी खोबरेल तेलाचा पॅक नाकावर, हुनवटीवर ब्लॅक हेड्स असल्यास त्यावर खोबऱ्याचं तेल हा उत्तम उपाय आहे. ब्लॅक हेड्स घालवण्यासाठी 2 लहान चमचे खोबऱ्याचं तेल घ्यावं. त्यात थोडा लिंबाचा रस आणि 1 छोटा चमचा बेकिंग सोडा घालावा. हे सर्व नीट एकत्र करुन हा लेप नाक, हुनवटी, कपाळावर लावावा. 5-7 मिनिटानंतर चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. या लेपानं केवळ ब्लॅक हेड्सच जातात असं नाही तर त्वचा नैसर्गिकरित्या खोलवर स्वच्छ होते.
https://twitter.com/NehaDhupia/status/1570614236262576128?s=20&t=hinECmv7zkFeYrr2B_unfA
Actress Neha Dhupia Beauty Secrets Tips
Bollywood Entertainment