इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सोशल मीडियाची क्रेझ असणारे काही कमी नाहीत. सुरुवातीला याला नाकं मुरडणारे आता सातत्याने सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेले दिसतात. कलाकार हे मुळातच लाईम लाईटमध्ये असतात. या सोशल मीडियामुळे तर त्यांना अनेक गोष्टी आपल्या चाहत्यांसोबत शेअर करता येतात. ज्येष्ठ कलाकारांना देखील आता याचे वेड लागलेले दिसते आहे. अभिनेत्री नीतू कपूर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतो आहे. यात त्यांचा डान्स तर आहेच पण सोबतीला पद्मिनी कोल्हापुरेंनी ठेका धरलेला दिसतो आहे.
नीतू कपूर झाल्या सोशल
बराच काळ सामाजिक जीवनापासून लांब असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री नीतू कपूर या अलीकडे अनेक कार्यक्रमांमध्ये दिसतात. एका डान्स रिॲलिटी शोमध्ये त्या सध्या परीक्षकाच्या भूमिकेत आहेत. नुकताच नीतू कपूर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यात त्या आपली सूनबाई आलिया भट्टच्या आरआरआर या चित्रपटातील नाटू-नाटू या गाण्यावर जबरदस्त डान्स करत आहेत. विशेष म्हणजे यात त्या एकट्याच नाहीत तर त्यांच्यासोबत अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनीही मस्त ठेका धरला आहे.
नेटकऱ्यांनी बांधले दोघींच्या कौतुकाचे पूल
आलिया भट्ट सध्या मेट गाला इव्हेंटसाठी गेली असून नीतू मैत्रिणींसोबत आलियाला चिअर करताना दिसत आहेत. या वयातही नीतू कपूर यांचा डान्ससाठी असलेला उत्साह तरुणांना लाजवणारा आहे. हा भन्नाट डान्स पाहून सगळेच वेडे झाले आहेत. अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेही नीतू कपूरसोबत डान्स करत होत्या. त्या दोघींच्या उत्साहाचे सर्वजण कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या अनेक कॉमेंट्स येत असून रामचरण आणि ज्युनियर एनटीआरही तुमच्यासमोर फिके ठरल्याची कमेंट एका चाहत्याने केली आहे.
माझेही इन्स्टा रील लवकरच
पद्मिनी कोल्हापुरे यांनी हा व्हिडिओ त्यांच्या इन्स्टावर शेअर केला आहे. ‘माझ्या आवडत्या नीतू कपूरसोबत नाटू-नाटूवर नृत्य.. हळूहळू तेथे पोहोचेनच, Instareels’, अशी कॅप्शनही त्यांनी याला दिली आहे. नीतू कपूर यांनी ही पोस्ट त्यांच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केली आहे.
Actress Neetu Kapoor and Padmini Kolhapure Dance Video Viral