इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगभरात अनेक दानशूर व्यक्ती असून त्या इतरांना मदत करण्यासाठी नेहमीच तयार असतात. यामध्ये काही सेलिब्रिटी आणि राजकीय व्यक्तींचा देखील समावेश होतो. ब्रिटनच्या राजघराण्यातील काही व्यक्ती खूपच प्रसिद्ध आहेत. त्यांच्या संदर्भात जगभरात नेहमी चर्चा होत असते. राजकुमार प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी अभिनेत्री मेगन मार्कल दोन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. मात्र त्यांची पत्नी अद्यापही चर्चेत असते याला कारण म्हणजे तिचा दानशूरपणा होय.
प्रिन्स हॅरी आणि त्याची माजी पत्नी अभिनेत्री मेगन मार्कल हे पुन्हा एकत्र दिसले. मेगनने दोन वर्षांपूर्वी रॉयल लाईफ सोडली आणि उत्तर अमेरिकेत स्थलांतरित झाली, परंतु अलीकडेच तिच्या दिसण्याने चाहत्यांची मने जिंकली असून त्यात एक व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला होता. त्यामध्ये मेगन एका महिलेला तिच्या मुलाला झाकण्यासाठी तिचा कोट देताना दिसत होती. हा व्हिडिओ पाहताच इंटरनेटवर व्हायरल झाला आणि थोड्याच वेळात या कोटची किंमत किती आहे हे देखील कळले.
मेगनने मुलाला झाकण्यासाठी आणि हाताळण्यासाठी दिलेल्या कोटची किंमत 3 लाख रुपये होती. एका व्यक्तीने ट्विट केले की, ‘हे दृश्य इतके छान व गोंडस आहे की, मेगन मार्कलने तिचा कोट त्या महिलेला दिला जेणेकरून महिलेच्या बाळाला उबदार वाटेल आणि त्याला थंडी जाणवू नये. मेगनच्या कोटची किंमत 3 लाख 8 हजार रुपये होती.
दरम्यान, मेगनचे पापाराझींनी क्लिक केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये,दर्शक मेघन मार्कलला दाराबाहेर जाताना पाहू शकता. तर दुसर्या व्हिडिओमध्ये मेगन महिलेसोबत असल्याचे पाहू शकता. सोशल मीडियावर युजर्स मेगनच्या या वागण्याचे कौतुक करत आहेत आणि हा व्हिडिओ फॅन पेजवर प्रचंड शेअर केला जात आहे. तसेच अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि मेगन खूप चांगल्या मैत्रिणी आहेत.