रविवार, जून 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पतीच्या निधनानंतर माझ्याकडे हे दोनच पर्याय होते…. अभिनेत्री मंदिरा बेदीने मोकळं केलं मन

by India Darpan
फेब्रुवारी 4, 2023 | 5:18 am
in मनोरंजन
0
Mandira Bedi

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – १९९४ साली दूरदर्शनवर प्रसिद्ध असलेल्या ‘शांती’ मालिकेतून अभिनेत्री मंदिरा बेदी घराघरात पोहोचली. टीव्हीवर केवळ दूरदर्शनच होते, तेव्हा ही मालिका फारच प्रसिद्ध होती. अगदी त्या काळापासून मंदिरा बेदीने स्वतःला सिद्ध केलं. त्यानंतर मंदिराने बॉलिवूडपासून क्रिकेटपर्यंत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. काही काळ ती इंडस्ट्रीपासून दूर राहिली. आता नवीन वर्षात मंदिराने आपली दमदार सुरुवात केली आहे. बऱ्याच काळानंतर मंदिरा क्रिकेटच्या रिऍलिटी शोमधून पुनरागमन करत आहे. लवकरच ती ‘क्रिकेट का टिकट’ हा रिऍलिटी शो होस्ट करणार आहे. यानिमित्त एका मुलाखतीत आपले मन मोकळे केले आहे.

मंदिरा बेदीने सांगितलं की, “२०२३ हे वर्ष माझ्यासाठी खूप आशादायक आहे. ‘क्रिकेट का टिकट’च्या माध्यमातून मी नवीन वर्षाची सुरुवात करणार आहे. याशिवायही बरेच प्रकल्प हाती आहेत. मी काही स्क्रिप्ट्स देखील वाचत आहे. त्यातीलच काही प्रोजेक्ट्सना होकार देईन अशी आशा आहे. नवीन गोष्टी करायला मला नेहमीच आवडतं. यंदाही मी एक नवीन सुरुवात करणार आहे.

या वर्षाची सुरुवात एका नवीन रिऍलिटी शोपासून करणार असल्याबद्दल मंदिरा बेदीने या मुलाखतीत सांगितलं. “स्त्री आणि पुरुष या दोघांसाठी हा रिअॅलिटी शो आहे. हा वेगळ्या प्रकारचा शो आहे, असा शो याआधी कधीच झाला नव्हता. मी केलेल्या लाइव्ह टेलिकास्टपेक्षा हे खूप वेगळं आहे, म्हणूनच मी या शोसाठी खूप उत्सुक आहे.” असं मंदिरा सांगते.

टीव्हीवरील ‘शांती’ या मालिकेपासून ते स्पोर्ट्स अँकरपर्यंतचा मंदिरा बेदीचा प्रवास थक्क करणारा आहे. या दरम्यान तिने आयुष्यातील अनेक चढउतार पहिले आहेत. मंदिरा बेदीचा पती दिग्दर्शक राज कौशलचं २०२१ मध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. राज कौशलने ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’ असे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. मंदिरा बेदीने १९९९ मध्ये राज कौशलशी लग्न केलं.

पतीच्या मृत्यूबद्दल ती म्हणाली, “माझं आयुष्य बदललं आहे. तो गेल्यानंतर दोन वर्षांत माझ्याकडे खंबीर होण्याशिवाय पर्याय नव्हता. मी आता खूप खंबीर व्यक्ती आहे.” ती पुढे म्हणाली, “तुमच्या अगदी जवळच्या व्यक्तीला किंवा तुमच्या पार्टनरला गमावणं हा एक जीवन बदलून टाकणारा अनुभव आहे. अशा घटनेनंतर तुम्ही एकतर बुडू शकता किंवा पोहू शकता आणि मी पोहणं निवडलं आहे. मला दोन लहान मुले आहेत, माझं कुटुंब आहे. त्यामुळे माझ्याकडे पोहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.”

Actress Mandira Bedi Tell About After Husband Death

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘पीएम केअर फंड’वर नक्की मालकी कुणाची? केंद्र सरकारने न्यायालयात केले स्पष्ट

Next Post

टीव्हीवर काहीतरी फेकून मारावंसं वाटतं…. या मालिकेवर प्रेक्षक भडकले…. का? असं काय झालं?

Next Post
FnyWmosaUAEDWLI

टीव्हीवर काहीतरी फेकून मारावंसं वाटतं.... या मालिकेवर प्रेक्षक भडकले.... का? असं काय झालं?

ताज्या बातम्या

11111111

‘जॉन डिअर’ने महाराष्ट्रात स्मार्ट मशिन्स तयार करून जगात निर्यात कराव्यात…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 8, 2025
crime1

रिक्षा प्रवासात महिलेचे पावणे दोन लाख रूपयाचे दागिणे चोरट्यांनी केले लंपास…

जून 8, 2025
PICV8YK

डीआरडीओने १० उद्योगांना नऊ प्रणालींचे तंत्रज्ञान केले हस्तांतरित…

जून 8, 2025
rainfall alert e1699421697419

राज्यात इतका पाऊस…तर मुंबई शहर जिल्ह्यात काल सर्वाधिक ४१ मिमी पाऊस

जून 8, 2025
nilesh rane

नितेशने जपून बोलावे, मी भेटल्यावर बोलेननच…निलेश राणेंचा भावाला सल्ला

जून 8, 2025
election11

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निकालांच्या संदर्भात केलेले दावे….निवडणूक आयोगाने दिली ही प्रतिक्रिया

जून 8, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011