मुंबई – अभिनेत्री मलायका अरोरा सध्या सोशल मिडियात मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने कलम १४४ म्हणजेच संचारबंदी (कर्फ्यू) लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन सरकारने केले आहे. मात्र, त्याची तमा न बाळगता मलायका तिचा कुत्रा कॅस्परला फिरायला घेऊन जाण्यासाठी घराबाहेर पडली. मुंबईतील एका रस्त्यावर ती कुत्र्यासोबत दिसली. त्याचा व्हिडिओ योगेन शहा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहताच नेटकरी भटकले असून त्यांनी मलायकाला ट्रोल केले आहे. नियम का फक्त सर्वसामान्यांनाच आहेत का, सेलिब्रेटींना नाही का, काही दिवस कुत्र्याला फिरायला नाही नेले तर काही फरक पडणार आहे का, मलायकाला कोरोनाची सद्यस्थिती माहित नाही का, असा भरमसाठ प्रश्न विचारत नेटकरी मलायकाचा खरपूस समाचार घेत आहेत.