मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – एकेकाळी ‘माधुरी दीक्षित’ हे नुसते नाव जरी उच्चारले तरी ‘दिल धक धक करने लगा.. ‘ अशी बहुतांश रसिक प्रेक्षकांची मनस्थिती होती, कारण माधुरी दीक्षित ही ९० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री ठरली होती. यासोबतच त्याने आतापर्यंत स्वतःचे स्टारडम कायम ठेवले आहे. त्याचबरोबर माधुरी लवकरच डिजिटल डेब्यू करणार आहे.
नेटफ्लिक्स मालिका ‘द फेम गेम’मध्ये ती प्रसिद्ध स्टार ‘अनामिका’च्या भूमिकेत दिसत आहे. ही मालिका 25 फेब्रुवारीला प्रसारित झाली आहेत. माधुरीने या मालिकेबद्दल एक मुलाखत दिली आहे, त्यामध्ये तिने आतापर्यंतचा सर्वात मजेदार किस्सा सांगितला आहे.
माधुरीने तिच्या आतापर्यंतच्या सर्वात विचित्र चाहत्याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याला उत्तर देताना माधुरी म्हणाली, माझ्या घरी एक माझा फॅन तथा चाहता आला होता, विशेष म्हणजे तो त्याच्या सर्व सामानासह माझ्या घरी पोहोचला होता. त्याचे वय सुमारे ५० वर्षे असावे आणि तो दारात उभा होता.
नोकराने दार उघडल्यावर तो म्हणाला, माधुरी जी यांनी मला बोलावले आहे, त्याला का बोलावले आहे असे विचारले असता त्याने सांगितले की, माधुरी जी त्याला दत्तक घेऊ इच्छिते. हे ऐकून आम्ही सगळे थक्क झालो. जेव्हा त्याला विचारण्यात आले की, तो माझ्याशी कधी बोलला ? तेव्हा तो म्हणाला, ‘मी घरीच होतो’.
ती टीव्हीवर आली होती. ती माझ्याशी बोलत होती, मी तिच्याशी बोलत होतो. मग ती म्हणाली घरी ये. तर मग मी आलोय’. त्यावर माधुरी दीक्षित हसली आणि म्हणाली, ‘ प्रेक्षकांना वाटते की, ते टिव्हीवर काहीही पाहतात, ते सर्व खरे असते आणि त्यांच्यासाठी खरे ठरते ?
यादरम्यान माधुरी दीक्षितला ‘द फेम गेम’बद्दल विचारले असता ती म्हणाली, ‘मला स्क्रिप्ट आवडली. हे एक प्रकारच्या प्रसिद्ध व्यक्तीबद्दल आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रसिद्ध होता तेव्हा काय होऊ शकते आणि कोणत्या अडचणी येतात. ही एका स्त्रीची कथा आहे जिचे आयुष्य परिपूर्ण दिसते. मात्र ती एक दिवस गायब होईपर्यंत. मग प्रत्येकजण तिच्याबद्दल विचार करतो?… असेही तिने सांगितले.