मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा –
बॉलिवूड म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टीत अनेक हिरोईन म्हणजेच अभिनेत्री यांनी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांची मने जिंकली, यामध्ये प्रामुख्याने एका अभिनेत्रीचे नाव घेण्यात येते, ती म्हणजे मधुबाला होय, आरस्पाणी सौंदर्य जणू काही ‘चांद का तुकडा ‘ असे जिला म्हटले जात होते, ती अभिनेत्री मधुबाला त्या काळातील अनेकांच्या काळजाची धडकन होती. तर दुसरीकडे किशोर कुमार हे भारतीय गीत गायन क्षेत्रातील एक चलनी नाणे होते इतकेच नव्हे तर ते अभिनेते देखील होते.
मधुबालाने किशोर कुमारसोबत ‘चलती का नाम गाडी’ आणि ‘हाफ तिकीट’ सारख्या चित्रपटात काम केले. दरम्यान, दोघेही प्रेमात पडले. एके दिवशी किशोर कुमारच्या सांगण्यावरून मधुबालाने लग्नाला होकार दिला. किशोरचे या अभिनेत्रीवर इतके प्रेम होते की त्यांनी धर्म बदलला आणि नावही बदलले, असे म्हणतात, दोघांचे लग्न झाल्यानंतर काही वेळातच मधुबालाला हृदयविकार झाल्याचे समजले.
मधुबाला त्यांच्या काळात मोठ्या पडद्यावर सौंदर्याच्या मूर्तीपेक्षा कमी नव्हती. असे अनेक स्टार्स तथा अभिनेत्री यांनी प्रेक्षकांची मने जिंकली, पण मधुबालाला टक्कर देऊ शकले नाही. वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी तिच्या निधनाने अनेक प्रियजनांना प्रचंड दुःख झाले. तिच्या प्रेमाच्या चर्चा आणि किस्से आजही प्रसिद्ध आहेत. पण मधुबालाचे लग्न प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्याशी झाले .
मधुबालाचे दिलीप कुमार यांच्यावर खूप प्रेम होते. मात्र, दोघांचे लग्न होऊ शकले नाही. नंतर तिने किशोर कुमारशी लग्न केले. मधुबाला यांचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन झाले. त्यांना हृदयविकार होता. तिने काही वर्षांपूर्वी दिलीप कुमारशी लग्न केले होते. ती मुस्लिम होती, ही गोष्ट तिच्या बहुतेक चाहत्यांना माहीत आहे. पण किशोर कुमारने तिच्याशी लग्न करण्यासाठी धर्म बदलल्याचे अनेकांचा समज आहे. मात्र, किशोर कुमारने कधीही धर्म बदलला नसल्याचा खुलासा त्याची बहिण मधुरने केला आहे. शेवटच्या काळापर्यंत ते हिंदूच राहिले.
मधुबाला मुस्लिम होत्या. त्यांचे खरे नाव मुमताज जहाँ बेगम देहलवी होते. उपचारासाठी लंडनला जाण्यापूर्वी तिने १९६० मध्ये किशोर कुमार यांच्याशी लग्न केले. किशोर कुमारने मधुबालासोबत लग्न करण्यासाठी धर्म बदलला, मधुबालाच्या बहिणीने या वृत्तांचे खंडन केले आहे. एका मुलाखतीत त्यांनी म्हटले की, बरेच जण म्हणतात की किशोर कुमारने मधु आपा सोबत लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला, पण हे खरे नाही. ते हिंदू होते आणि मरेपर्यंत हिंदूच राहिले. आमच्या कुटुंबात लग्न झालेल्या कोणत्याही पुरुषांनी धर्म बदलला नाही.
मधुबालाची बहीण मधुर भूषण हिचा विवाह एका हिंदू पंजाबीशी झाला होता. त्याची बहीण चंचलने पंजाबीशी लग्न केले आणि अल्ताफ आणि कनीज या दोन बहिणींनी पारशी लोकांशी लग्न केले. किशोर कुमार यांच्या पत्नी मधुबाला या १९६९ मध्ये मृत्यू पावल्या. आजार मुळे डॉक्टरांनी तिला फक्त दोन वर्षे जगणार, असे सांगितले होते उपचारांच्या मदतीने ती ९ वर्षे जगली. यामागे त्याची इच्छाशक्ती होती असे त्याची बहीण मधुर मानते.
Actress Madhubhala Singer Kishor Kumar Entertainment Bollywood