मुंबई – चित्रपटातला खलनायक म्हटलं की तो वाईट प्रवृत्तीचाच असणार हे नेहमीच गृहीत धरले जाते. बॉलिवूडमधील जुन्या काळातले प्रसिद्ध खलनायक रणजित यांची दहशत एवढी होती की, प्रत्यक्षात देखील त्यांना अभिनेत्री घाबरत असत. या सगळ्यांमध्ये एक अशी अभिनेत्री होती, जी त्यांच्यावर मनापासून प्रेम करायची. मात्र त्यांची ही प्रेम कहाणी काही संपूर्ण झाली नाही.
ती अभिनेत्री होती अभिनेत्री डिम्पल कपाडियाची बहीण सिम्पल कपाडिया. रणजितच्या प्रत्येक गोष्टीवर तिचे प्रेम होते. मात्र, सिम्पल कपाडियाची चॉईस तिचे जिजाजी राजेश खन्ना यांना बिलकुल आवडली नाही. एक खलनायक म्हणून असलेली रणजीत यांची प्रतिमा राजेश खन्ना विसरू शकत नव्हते, त्यामुळेच त्यांचा या नात्याला विरोध होता.
सिम्पल कपाडिया आणि रणजीत यांच्या अफेअरच्या चर्चेमुळे त्यांचा राग बाहेर आला आणि यासाठी ते सिम्पलवर नाराजही होते. मात्र, काळानुसार या चर्चा संपुष्टात आल्या.