लाहोर (पाकिस्तान) – चित्रपट क्षेत्रातील कलाकारांविषयी रसिकांना एक वेगळेच आकर्षण असते. मग ते भारतातील असो की जगातील अन्य देशातील. त्यांच्याविषयी एक उत्सुकता, आदर आणि आदर्शाची भावना देखील नागरिकांच्या मनात असते. परंतु काही कलाकार समाजाला योग्य मार्गदर्शन करण्याऐवजी स्वतः चुकीच्या मार्गाचा वापर करतात.
पाकिस्तान एक महिला कलाकारांनी असाच प्रताप केला केल्याचे उघड झाले आहे. लाहोरमधील थिएटरमध्ये कपडे बदलताना काही सहकारी कलाकारांचा नग्न अवस्थेत व्हिडिओ बनवल्याबद्दल एका चित्रपट व रंगमंचावरील अभिनेत्रीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (FIA) च्या सायबर क्राइम विंगने अभिनेत्री खुशबू आणि तिचा साथीदार काशिफ चान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चित्रपटगृहाच्या चेंजिंग रूममध्ये गुप्त कॅमेरा बसवून इतर अभिनेत्रींना ब्लॅकमेल करण्याच्या आणि अपमानित करण्याच्या उद्देशाने आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
एफआयएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, नाटकात काम करणाऱ्या चार अभिनेत्रींचे नग्न अवस्थेत व्हिडिओ बनवण्याच्या उद्देशाने चेंजिंग रूममध्ये इंटेलिजेंस कॅमेरा बसवण्यासाठी खुशबू हिने थिएटर कर्मचारी चॅन याला एक लाख रुपये दिले. यानंतर खुशबूने ब्लॅकमेल करून त्या कलाकारांचे आक्षेपार्ह व्हिडिओ इंटरनेटवर टाकण्याचा प्रयत्न केला. बघा, कलाकारांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, नाटकाच्या निर्मात्याने एफआयएकडे गुन्हा नोंदवण्यासाठी संपर्क साधला. एफआयएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, चॅनला अटक करण्यात आली आहे. त्याने खुशबूच्या सांगण्यावरून चेंजिंग रूममध्ये गुप्त कॅमेरा बसवल्याची कबुली दिली आहे. त्याचबरोबर जामिन मंजूर झाल्याने खुशबूला 21 डिसेंबरपर्यंत अटकेतून दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे या नाटकाचे निर्माते मलिक तारिक मेहमूद यांनी सांगितले की, सहकारी अभिनेत्रींसोबत झालेल्या भांडणानंतर खुशबूला नाटकातून वगळण्यात आले होते त्यानंतर ती त्यांच्याशी सुडाने वागली असून त्यातून हा प्रकार घडला असावा,परंतु असा गैरप्रकार वाईट आहे.