मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठी अभिनेत्री केतकी चितळे सातत्याने काही ना काही वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर टाकत असल्याने चर्चेत येत असते. आता पुन्हा अशीच वादग्रस्त पोस्ट तिने टाकली आहे. यामध्ये शरद पवारांवर निशाणा तिने साधला आहे. याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केतकी चितळे सातत्याने तिच्या वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यामुळे समोर येत असते. आता पुन्हा ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल तिने फेसबुकवर पोस्ट टाकली असून, तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहर अध्यक्ष स्वप्निल नेटके यांनी कळवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये केतकीच्या पोस्टमुळे प्रचंड नाराजी पसरली आहे. तिची पोस्ट राजकीय पक्षांमध्ये द्वेषाची भावना, तेढ निर्माण करणारी आहे असं म्हणलं जात आहे. शिवाय ही पोस्ट शरद पवार यांची बदनामी, मानहानी करणारी असल्याचंही कार्यकर्त्यांनी म्हणलं आहे. तिच्याविरोधात ५०५ (२), ५००, ५०१, १५३ ए नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केतकीच्या या पोस्टला हजारो प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे त्यातल्या काही प्रतिक्रिया या केतकीच्या पोस्टचे समर्थन करणाऱ्या आहेत.
काय आहे पोस्ट?
तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक ll
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll
https://twitter.com/BHARATGHANDAT2/status/1525430687960289280?s=20&t=qnGESwFelyejBXCVWrhWJQ