इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेत्री करिष्मा कपूर आज फारशी सक्रिय नसली तरी लोकप्रिय आहे. तिच्या वैयक्तिक जीवनात अनेक चढउतार आले असले तरी तिच्या लोकप्रियतेत काहीच फरक पडलेला नाही. ९० च्या दशकात अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये करिश्माने काम केले होते. काही दिवसांपूर्वी करिश्मा पूर्वाश्रमीच्या पतीबरोबर एकत्र डिनर डेटवर गेल्याने नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केल्याचं वृत्त समोर आलं होतं. आता त्यांच्या घटस्फोटाची चर्चा पुन्हा रंगते आहे.
मी गरोदर असताना माझा छळ
करिश्मा आणि संजय यांनी २०१४ मध्ये घटस्फोट घ्यायचं ठरवलं. त्यावेळी या दोघांच्या घटस्फोटाची प्रचंड चर्चा झाली. दोन्ही बाजूकडून वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळत होत्या. करिश्माने तिच्या सासरकडच्या लोकांवर अनेक गंभीर आरोप केले होते. एका सुनावणीदरम्यान करिश्माने संजयवर गंभीर आरोप केले. करिश्मा म्हणाली, एकदा मला माझ्या सासूने एक ड्रेस भेट म्हणून दिला होता. त्यावेळी मी गरोदर होते. तो ड्रेस मला बसू शकत नव्हता. हे पाहून संजय एवढा भडकला की त्याने त्याच्या आईला मला थप्पड मारण्यास सांगितले. संजयने आईकडे पाहिले आणि म्हणाला तू तिला थप्पड का मारत नाहीस? एवढंच नाही तर करिश्माने असेही म्हटले होते की, संजयचे विवाहबाह्य संबंध होते आणि त्याची आई त्याला या सगळ्यात साथ देत होते. लग्नानंतरही संजयचे त्याच्या पहिल्या पत्नीबरोबर शारीरिक संबंध असल्याचा आरोपही करिश्माने केला होता.
संजय कपूरने पुन्हा बांधली गाठ
करिश्मा आणि संजय यांनी २००३ मध्ये लग्नगाठ बांधली. मात्र, लग्नाच्या काही वर्षांमध्येच दोघे वेगळे झाले. करिश्माशी घटस्फोट घेतल्यानंतर संजय कपूरने प्रिया सचदेवाशी लग्न केलं. मात्र, घटस्फोटानंतर करिश्माने दुसरं लग्न केलं नाही. करिश्मा आणि संजयला एक मुलगा मुलगी आहे. समायरा आणि कियान अशी दोघांची नावे आहेत. ही दोन्ही मुलं करिश्माकडे आहे.