इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणात बॉयकॉटचा ट्रेंड सुरू आहे. अनेक चित्रपट निर्मात्यांना याचा फटका बसत असून हा ट्रेंड बॉलीवूडला मारक ठरत आहे. अशात आता नेटकऱ्यांनी जाहिरातींवरही बॉयकॉट ट्रेंडची मागणी केली आहे. अभिनेत्री करीन कपूरने कार लाँच इव्हेंटमध्ये रॅम्प वॉक करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. करीनाच्या व्हायरल व्हिडीओमध्ये ती ग्रेसफुली वॉक करताना दिसत आहे. या व्हिडीओला कमेंट करुन करीनानं केलेल्या कारच्या जाहिरातीवर बहिष्कार टाकण्याची मागणी नेटरकरी करत आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर सध्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी नेटकरी करत होते. ‘बॉयकॉट ट्रेंड’मुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई करू शकला नाही. करीनानं नुकताच मुंबईत एका कार लॉन्च इव्हेंटमध्ये सहभाग घेतला. या इव्हेंटमध्ये करिनाने रॅम्प वॉक केला होता. करीनाच्या या रॅम्प वॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी करीनाला ट्रोल केलं आहे.
मर्सिडीज कारच्या इव्हेंटमध्ये करिनाने रॅम्प वॉक केला. करिनाने केलेल्या वॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आता या व्हिडीओला कमेंट करुन नेटकऱ्यांनी करिनाला ट्रोल केले आहे. या व्हिडिओवर एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘आता मर्सिडीजवर बहिष्कार टाका. बॉयकॉट मर्सिडीज’ तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, ‘फक्त चित्रपट नाही तर हिच्या जाहिराती देखील बॉयकॉट करा’.
आमिर खान आणि करिनाचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटामध्ये करीना आणि आमिरसोबतच नागा चैतन्य, मानव विज, मोना सिंह या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली.
‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित झाला. आमिर खान प्रोडक्शन्स, किरण राव, वायकॉम 18 स्टडियोज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आमिर आणि करीनाच्या काही जुन्या वक्तव्यांमुळे या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी नेटकऱ्यांनी केली होती. त्यामुळे अमीर खानला मोठं नुकसान सहन करावे लागल्याचे सांगितले जात आहे.
Actress Kareena Kapoor Troll Social Media Boycott
Lal Singh Chaddha Movie Mercedes Car Promotion