मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलीवूड अर्थात हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार काही वेळा वादाच्या भवऱ्यात अडकतात. अभिनेत्री करीना कपूर खानच्या गर्भधारणेशी संबंधित ‘करीना खान प्रेग्नन्सी बायबल’ या वादग्रस्त पुस्तकाचे प्रकरण आता जबलपूर उच्च न्यायालयात पोहोचले आहे. या प्रकरणावरील प्राथमिक सुनावणीनंतर बुधवारी न्या. डी. के. पालीवाल यांच्या एकल खंडपीठाने राज्य सरकारला पक्षकार बनवण्याचे निर्देश दिले आहेत, ज्याची पुढील सुनावणी दि. 16 सप्टेंबर रोजी होणार आहे.
या प्रकरणी याचिकाकर्ते वकील क्रिस्टोफर अँथनी यांनी सादर केले की, करीना खान प्रेग्नन्सी बायबल नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे, ज्यामध्ये ख्रिस्ती धर्माच्या पवित्र पुस्तकाचे शीर्षक बायबल आहे. बायबल हा शब्द करीना खान प्रेग्नन्सी बायबल या पुस्तकाच्या शीर्षकाला जोडला गेला आहे. ख्रिश्चन धर्माच्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. क्रिस्टोफर अँथनी यांनी सांगितले की, या संदर्भात ओमटी पोलिस स्टेशन आणि पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करून करीना आणि प्रकाशकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. कारवाई न झाल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.
करीना कपूर खानने 9 जुलै 2021 रोजी तिचे पुस्तक लॉन्च केले. फेब्रुवारीमध्ये दुस-या मुलाला जन्म देणाऱ्या करीनाने (४०) या पुस्तकाचे तिसरे अपत्य म्हणून वर्णन केले होते. पुस्तकाच्या प्रमोशनच्या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर अनेक पोस्ट केल्या होत्या. करीना कपूर खानच्या म्हणण्यानुसार, या पुस्तकात तिने तिच्या दोन्ही गर्भधारणे दरम्यान अनुभवलेल्या शारीरिक आणि भावनिक अनुभवांचा उल्लेख केला आहे.
मात्र सध्या या पुस्तकावरून बराच वादंग सुरू असून आता उच्च न्यायालयात याप्रकरणी खटला दाखल करण्यात आला आहे. तसेच अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रेसिडंट असलेले आशिष शिंदे यांनी या पुस्तकाच्या नावावरून बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीत सांगण्यात आलं आहे की, ‘प्रेग्नन्सी बायबल’ची लेखिका करिना कपूर आणि अदिती शाह भीमजानी आहे आणि हे पुस्तक जगरनॉट बुक्सने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे.
शिंदे यांच्या मते, ‘पवित्र शब्द ‘बायबल’ हा पुस्तकाच्या नावात वापरण्यात आला आहे. ज्यामुळे ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहे.’ त्यांनी करिना आणि अन्य दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. दरम्यान करिनाचं पुस्तक ‘प्रेग्नन्सी बायबल’ प्रकाशित झालं. तिनं सोशल मीडियावर पुस्तकाचं प्रमोशन करत असतानाच वेगवेगळ्या पोस्ट केल्या होत्या. तेव्हा देखील काही धार्मिक संघटनांकडून तिचा निषेध व्यक्त करण्यात आला होता.
Actress Kareena Kapoor Controversy Christian Community Big Decision
Pregnancy Bible Book Contro
High Court Petition