सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
अभिनेता सलमान खानचा प्रसिद्ध रिअॅलिटी शो असलेल्या बिग बॉसला टक्कर देणार आहे अभिनेत्री कंगना रणौतचा नवीन शो. हो याविषयी एकता कपूरने खुलासा केला आहे. कंगना राणौत तिचा नवीन रिअॅलिटी शो ‘लॉक अप: बदास जेल, अत्याचारी खेल’ होस्ट करेल. चाहते देखील या शोबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. नुकताच, ‘बिग बॉस’चा 15 वा सिझन संपला, जो की सलमान खान होस्ट करत होता. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर यूजर्सनी कंगना रणौत आणि सलमान खान यांची तुलना करत पोस्ट करायला सुरुवात केली आहे.
सतत तिच्या वादग्रस्थ विधानांमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना राणौत तिच्या अभिनयासोबतच कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन म्हणूनही ओळखली जाते. अभिनेत्री पुन्हा एकदा त्याच मार्गावर आहे. यावेळी ती ‘बिग बॉस’ च्या सवतः च्या आवृत्ती Alt Balaji आणि MX Player वरील एकता कपूर निर्मित ‘लॉक अप: बदास जेल, अत्याचारी खेल’ हा शो होस्ट करण्यासाठी सज्ज आहे. या शो मध्ये 16 वादग्रस्त सेलिब्रिटींना अनेक महिन्यांसाठी लॉकअपमध्ये ठेवले जाईल. त्यांच्या सुविधाही हिरावून घेतल्या जातील. त्यात, कंगना रणौत शोचा एक ज्वलंत होस्ट म्हणून पाऊल ठेवणार आहे. एक धाडसी सेलिब्रिटी होस्ट, आकर्षक कार्ये, नाट्यमय मारामारी आणि तुरुंगात टिकून राहण्यासाठी काहीही करतील अशा स्पर्धकांचे मनोरंजक मिश्रण असलेला या शो मध्ये अजून की नाविन्य असेल हे बघण्यासाठी सर्वांची उत्सुकता वाढलेली आहे. तसेच,एकता कपूरने वचन दिले आहे की हा शो ‘सत्य आणि वादांनी भरलेला’ असेल, स्पर्धकांना तुरुंगात बंद करून त्यांच्या सुटकेवर यजमानाचा अधिकारअसेल असे तिने सांगितले.
ALTBalaji आणि MX Player त्यांच्या संबंधित प्लॅटफॉर्मवर हा शो 24×7 लाइव्ह स्ट्रीम करण्यात येणार आहे आणि प्रेक्षकांना थेट स्पर्धकांपर्यंत घेऊन जाण्यात येईल. दर्शकांना त्यांच्या निवडलेल्या स्पर्धकांना शिक्षा किंवा बक्षीस देण्याची आणि त्यांच्यापैकी काहींसाठी ‘खबरी’ची भूमिका करण्याची संधी देखील मिळेल.एकता कपूर ने माहिती दिली की, “रिअॅलिटी शोच्या इतिहासात प्रथमच, दोन प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपण केले जाईल.” Endemol Shine India द्वारे निर्मित, हा शो 27 फेब्रुवारी 2022 पासून ALTBalaji आणि MX Player वर प्रीमियर होईल.